शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर खत पोहोचविण्यात यंत्रणा असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:58 IST

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात खताची तीव्र टंचाई जाणवत आहे. बांधावर तर दूरच; परंतु दुकानातदेखील युरियाची उपलब्धता करण्यात यंत्रणा असमर्थ ठरली. परिणामी ऐन हंगामात खतासाठी भटकंतीची वेळ आल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात खताची तीव्र टंचाई जाणवत आहे. बांधावर तर दूरच; परंतु दुकानातदेखील युरियाची उपलब्धता करण्यात यंत्रणा असमर्थ ठरली. परिणामी ऐन हंगामात खतासाठी भटकंतीची वेळ आल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात सोय होणार नाही यासाठी थेट बांधावर निविष्ठा पोहोचविण्याची संकल्पना कृषिमंत्री दादा भुसे यांनी मांडली होती. सुरुवातीला या संकल्पनेला चांगले पाठबळ मिळाले.त्यानंतर मात्र अनेक भागात निविष्ठा टंचाईची समस्या भेडसावू लागली. युरिया, डीएपी खतांची मात्र तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. रेल्वेच्या रेक पॉइंटमुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगत कृषी विभाग, दुकानदार यांच्यामार्फत असे सांगण्यात येत आहे.आता पिकाच्या वाढीसाठी खताची गरज असताना तेच मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. खताची टंचाई भासवित बोगस खते शेतकºयांकडे खपविली जात आहेत. परिणामी आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांची कोंडी झाली आहे. खतपुरवठा विस्कळीत लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था प्रभावित झाल्याने खताचा पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळेदेखील परिसरात खतटंचाई गडद झाल्याचे सांगितले जाते. परंतु याचा खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात खरीपमधील भात पिकाची लागवड सुरू आहे. तण नियंत्रणाचे कामही अनेक शेतकºयांनी केले.------------------बांधावर तर दूरच; परंतु दुकानात गेल्यावरही खत मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. हंगामात कृषी सहाय्यकांनी मार्गदर्शनासाठी शेतावर जाण्याची गरज असताना तेसुद्धा फिरकत नाही. शासनाने इतर जबाबदाºया सोपविल्याचे ते सांगतात. अशा स्थितीत शेतकºयांनी काय करावे व कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न आहे.- संतोष निसरड, शेतकरी, कवडदरा

टॅग्स :Nashikनाशिक