शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
2
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
3
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
4
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
5
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
6
शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण
7
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
8
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
9
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
10
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
11
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
12
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
13
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
14
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
15
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
16
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
17
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
18
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
19
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
20
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती

ड्राय रनच्या माध्यमातून यंत्रणेची सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 1:32 AM

कोरोनाला प्रतिबंध करणारी लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नाशिक शहरासह पाच ठिकाणी ‘ड्राय रन’ घेण्यात आली. त्यात १२५ जणांवर रंगीत तालीम करण्यात येऊन सज्जता तपासण्यात आली. यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली.

ठळक मुद्दे१२५ जणांवर रंगीत तालीम : रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता

नाशिक : कोरोनाला प्रतिबंध करणारी लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नाशिक शहरासह पाच ठिकाणी ‘ड्राय रन’ घेण्यात आली. त्यात १२५ जणांवर रंगीत तालीम करण्यात येऊन सज्जता तपासण्यात आली. यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली.      केंद्र सरकारने संपूर्ण देशात एकाच वेळी ड्राय रन घेण्याच्या सूचना दिल्याने शुक्रवारी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालय, त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय, सय्यद पिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक महापालिका नवीन बिटको रुग्णालय, मालेगाव शहरातील मदनेनगर रुग्णालय या पाच ठिकाणी सकाळी १० वाजता या तयारीला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक केंद्रात २५ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची यासाठी निवड करण्यात आल्याने अगोदर त्यांची को-विन या ॲपमध्ये संपूर्ण माहिती भरण्यात येऊन लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना लसीकरणाची माहिती देण्यात आली व त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष व्हॅक्सिनेशन रूममध्ये सुरक्षित अंतर ठेवून लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा विश्रांती कक्षात अर्धा तास ठेवण्यात आले. या लसीकरणाचे परिणाम झाल्याचे मानून काही लाभार्थ्यांना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले. ही सारी प्रक्रिया तासभर चालली. लसीकरण करणाऱ्या लसटोचकांना संपूर्ण पीपीई कीट देण्यात आले होते. तसेच प्रत्येक व्यक्तीचे तापमान तपासूनच लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात आला. हातमोजे, तोंडावर मास्क व सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत पुरेपूर दक्षता घेण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता ही रंगीत तालीम संपुष्टात आली. त्यात प्रत्येक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येऊन त्रुटींचा शोध घेण्यात आला. मात्र जिल्ह्यात ही प्रक्रिया यशस्वी पार पडल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रवींद्र चौधरी, डॉ. दावल साळवे, विनोद मेढे, डॉ. कैलास भोये, डॉ. माधव अहिरे, डॉ. परशुराम किरवले,  डॉ. जयश्री नटेश, डॉ. जयश्री पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस