शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लू संशयित रुग्ण सामान्य कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 01:55 IST

महापालिकेच्या जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय नेहमी विविध कारणांसाठी चर्चेत असते. गुरुवारी (दि.१३) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून स्वाइन फ्लूसदृश रुग्णांना जागेअभावी झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले; मात्र येथील रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना ‘स्वाइन फ्लू आयसोलेशन कक्षात’ दाखल करण्याऐवजी थेट सामान्य पुरुष कक्षात दाखल केल्याने उपचार घेत असलेल्या अन्य रुग्णांसह नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

ठळक मुद्देझाकीर हुसेन रुग्णालय : नातेवाइकांचा संताप

नाशिक : महापालिकेच्या जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय नेहमी विविध कारणांसाठी चर्चेत असते. गुरुवारी (दि.१३) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून स्वाइन फ्लूसदृश रुग्णांना जागेअभावी झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले; मात्र येथील रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना ‘स्वाइन फ्लू आयसोलेशन कक्षात’ दाखल करण्याऐवजी थेट सामान्य पुरुष कक्षात दाखल केल्याने उपचार घेत असलेल्या अन्य रुग्णांसह नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होतेजुन्या नाशकातील कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा वैद्यकीय कारभार सुरळीत चालण्यास अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रुग्णालयाची सूत्रे नेमकी कोणाला सोपवावी? हाच आता महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे मोठा प्रश्न आहे. मनुष्यबळासह औषधांचा तुटवडा, वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाºयांचा हलगर्जीपणा अशा विविध कारणांमुळे मनपाच्या आरोग्यविभागाला जनसामान्यांसह लोकप्रतिनिधींच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी हे रुग्णालय प्रसूतीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे चर्चेत राहिले होते. गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात जागा नसल्याने येवला व अन्य दुसºया शहरांमधून आलेल्या पुरुष, महिलारुग्णाला संध्याकाळच्या सुमारास झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना स्वाइन फ्लू कक्षात दाखल करून न घेता सामान्य क क्षात दाखल करत उपचाराला सुरुवात केली. हा प्रकार अन्य रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर येथील परिचारिकांना व डॉक्टरांना नागरिकांनी धारेवर धरले. स्वाइन फ्लू संशयित रुग्णाला सामान्य कक्षातून अन्यत्र हलविण्याची मागणी करत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी निषेध नोंदवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.डॉक्टरांनी संतप्त अन्य रुग्णांच्या नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत हे रुग्ण स्वाइन फ्लू संशयित नसल्याचा दावा केला; मात्र काही वेळेनंतर स्वाइन फ्लू संशयित पुरुष रुग्णाला तत्काळ स्वाइन फ्लू कक्षात येथील हलविले.रुग्णांनी धरला घराचा रस्तापुरुष, महिला सामान्य कक्षात उपचार घेणाºया रुग्णांपैकी सुमारे पंधरा ते वीस रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनी घराचा रस्ता धरणे पसंत केले. परिचारिकांनी संबंधित रुग्णांना डिस्चार्ज घेऊन घरी निघून जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला. ज्या रुग्णांना स्वाइन फ्लू रुग्णाची भीती वाटत असेल त्यांनी डिस्चार्ज घेऊन घरी जावे, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य