नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा शुक्रवारी(दि़६) दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या महिलेचा तपासणीसाठी पाठविलेल्या घशातील स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता़ दरम्यान, शहरातील स्वाइन फ्लूचा हा सतरावा बळी आहे़ गंगापूर रोडवरील निर्मला कॉलनीत राहणाऱ्या रत्ना भिका बागुल (३४) यांना शहरातील एका खासगी दवाखान्यात १ मार्चला दाखल करण्यात आले होते़ या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडतच गेली़ शुक्रवारी त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असता शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ सद्य:स्थितीत जिल्हा रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू कक्षात नऊ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे़ (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूने आणखीन एका महिलेचा मृत्यू
By admin | Updated: March 6, 2015 23:58 IST