चांदोरी : चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाईन फ्लू जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली होती. येथे मागील १ वर्षां पूर्वी १ स्वाईन फ्लू चा रु ग्ण चांदोरी येथील दगावला होता.या मध्ये स्वाईन फ्लू चा प्रसार कसा होतो त्याचे लक्षण कोणते प्राथमिक उपाययोजना गंभीरपणे असल्यास उपचार कोणते करावेस्वाईन फ्लू होऊ नये म्हणुन घ्यावयाची काळजी या संबंधी संपूर्ण माहिती देऊन गावकऱ्यांना गावामध्ये रॅली काढून जनजागृती केली.या रॅली दरम्यान सायखेडा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , सहाय्यक निरीक्षक जे डी सोनवणे ,चांदोरी आपत्ती व्यवस्थापनचे सागर गडाख ,राजेंद्र टर्ले ,महेश राजोळे ,फिकरा धुळे ,मधुकर आवारे ,विलास सूर्यवंशी,राहुल देवकर ,चेतन हिंगमीरे ,चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सागर पाटिल ,प्रशांत चौधरी ,अमोल नाठे, अरु ण कहांडळ ,राजेंद्र खैरनार ,संतोष वेडे , ,सीमा निफाडे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
चांदोरी येथे स्वाईन फ्लू जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 15:16 IST
चांदोरी : चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाईन फ्लू जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली होती.
चांदोरी येथे स्वाईन फ्लू जनजागृती मोहीम
ठळक मुद्देजनजागृतीपर पत्रक संपूर्ण गावात वाटण्यात आले.