शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्विफ्ट कारला मालगाडीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:35 IST

नाशिकरोड : सौभाग्यनगर येथे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार रेल्वे रु ळावर अडकली असता देवळाली कॅम्पकडून आलेल्या मालगाडीने कारला धडक देत रु ळाच्या बाहेर फेकले.

नाशिकरोड : सौभाग्यनगर येथे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार रेल्वे रु ळावर अडकली असता देवळाली कॅम्पकडून आलेल्या मालगाडीने कारला धडक देत रु ळाच्या बाहेर फेकले. यात कारचा चक्काचूर झाला आहे. कारचा चालक व इतर इसम अंधाराचा फायदा घेत पळून गेले.सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्विफ्ट डिझायरवरील (एमएच ३१/सीआर ५५५६) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार सरळ पुढे जाऊन रेल्वे रु ळात अडकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चालक व गाडीत असलेल्या इतरांची भंबेरी उडाली. त्यांनी रु ळात अडकलेली गाडी सोडवण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र त्याचवेळी देवळाली कॅम्पकडून नाशिकरोडकडे मालगाडी येत होती. मालगाडीचा लाईट व हॉर्नचा आवाज ऐकून संबंधित चालक व इतर पळून गेले. मालगाडीने रेल्वेरुळात कारला जोरदार धडक दिल्याने ती रु ळाच्या बाहेर फेकली गेली. मालगाडीच्या धडकेने गाडी चक्काचूर झाली आहे.मालगाडीचालकाने अपघाताची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानकाला कळवली. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू भोये त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे मालमत्तेचे नुकसान व रेल्वेच्या परिसरामध्ये अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर स्विफ्टची आरटीओ पासिंग नागपूरची असल्याचे पोलिसांनी सांगितले. गाडी मालक-चालक व त्यामधील लोकांचा रेल्वे सुरक्षा बल शोध घेत आहेत. युवती गाडी शिकत असताना ताबा सुटल्याने कार रेल्वे रु ळात जाऊन अडकल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashikनाशिक