शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांची भुजबळांच्या निवासस्थानी धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:47 IST

नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रक्रिया निविदा राबविण्यास सुरुवात केली

ठळक मुद्दे भाजप सत्तेच्या दबावाने भरतीसाठी घाईघाईने निविदा काढत त्याची अंमलबजावणी करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून सुमारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रक्रिया निविदा राबविण्यास सुरुवात केली असून, ही भरती तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी धाव घेऊन धडक दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मागासवर्ग विभागाचे प्रदेश चिटणीस सुरेश दलोड व कॉँग्रेसचे सरचिटणीस सुरेश मारू यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचा-यांनी एकत्र येत पालकमंत्री भुजबळ यांची निवासस्थानी भेट घेत महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा निषेध नोंदविला व निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की,भाजपने मनपा आयुक्त यांना हाताशी धरून ७०० सफाई कर्मचा-यांची भरतीसाठी निविदाप्रक्रिया राबविली आहे. यामध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाला असून, शासनस्तरावरून ही निविदा तत्काळ रद्द करावी व भाजपच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. कोरोनाची महामारी असतानाही सफाई कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कर्मचारी काम करीत आहेत. भाजप सत्तेच्या दबावाने भरतीसाठी घाईघाईने निविदा काढत त्याची अंमलबजावणी करीत आहे. महापालिकेकडे पैसा आहे. परंतु केंद्र व राज्य शासनाच्या भंगीमुक्ती पुनर्वसनाची अंमलबजावणी करण्यासाठी पैसे नसल्याचा आव आणित असल्याचा आरोपही यावेळी दलोड व मारू यांनी केला आहे. महापालिकेच्या या धोरणाविरुद्ध येत्या १५ जून रोजी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने समांतर अंतर पाळत मनपा मुख्यालयावर तीव्र निदर्शने करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी शेकडो सफाई कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाChagan Bhujbalछगन भुजबळ