शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे स्वामी, पुरी, गावडे यांना ‘आयएएस’पदी पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 19:56 IST

या चारही अधिकाऱ्यांच्या महसुल खात्यातील कामकाज आणि विविध विभागांमधील कार्याचा अनुभव बघता सरकारकडून त्यांना आयएएसपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रदीर्घ सेवेचा अनुभव बघता त्यांना आयएएसपदी बढती

नाशिक : विभागातील उपायुक्त असलेले दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, पुरवठा उपायुक्त प्रवीण पुरी, यांच्यासह शिर्डीचे मुख्यधिकारी कान्हुराज बगाटे यांना राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवापदी (आयएएस) पदोन्नती देण्यात आली आहे. राज्यातील एकूण २३ अपर जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.विभागीय महसुल कार्यालयातील उपायुक्त दिलीप स्वामी, यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, भुसंपादन अधिकारी या पदांवर दर्यापूर, अमरावती, पुसद, नांदेड, नाशिकला कामकाज पार पाडले आहे. सध्या विभागीय आयुक्तालयात ते कार्यरत आहेत. रघुनाथ गावडे हेदेखील विभागीय महसुल कार्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांनी नाशिकच्या जिल्हा प्रशासनात महत्त्वाचे कामकाज पार पाडत सिंहस्थ कुंभमेळा कक्षाचे ते अपर जिल्हाधिकारी म्हणून होते. यावेळी त्यांनी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने हरित कुंभमेळ्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा अनुभव बघता त्यांना आयएएसपदी बढती देण्यात आली आहे. शिर्डी येथील मुख्याधिकारी कान्हुराज बगाटे यांनाही बढती मिळाली आहे. बगाटे हे यापुर्वी नाशिकला अपर जिल्हाधिकारी पदावर होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत उपायुक्त, मुंबई-पुणे महामार्ग भुसंपादन अधिकारी, राज्य औद्योगिक विकास महामंडळ, विमानतळ विकास कंपनी, सरदार सरोवर, रत्नागिरी जिल्हा परिषदेत मुख्याधिकारी म्हणून त्यांनी कामकाज केले आहे. विभागीय आयुक्तालयात पुरवठा उपायुक्त पदाची सुत्रे सांभाळणारे पुरी यांनी यापुर्वी कोकण, ठाणे, नाशिक अशा विविध शहरांमध्ये काम केले आहे. त्यांनी प्रांतधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी पदावर यापुर्वी काम केले आहे. महसुल खात्याच्या जवळपास सर्वच विभागात त्यांनी आपल्या कार्यकाळात सेवा बजावली आहे.या चारही अधिकाऱ्यांच्या महसुल खात्यातील कामकाज आणि विविध विभागांमधील कार्याचा अनुभव बघता सरकारकडून त्यांना आयएएसपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विभागीय महसूल कार्यालयात कार्यरत तीघा अधिका-यांना बढती मिळाल्याने कार्यालयात आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार