येवला : क्र ीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर नुकत्याच संपन्न झाल्या. यात येवला येथील स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता अकरावी सायन्सचा विद्यार्थी जयेश नाना काळे याने ६२ किलो वजन गटात प्रथम क्र मांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे जयेश काळेची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जयेश काळे याला कॉलेजचेक्र ीडाशिक्षक प्रा. जी.जे. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. जयेश काळे याने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे सर्वस्तरातून त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद नागडेकर, सचिव दीपक गायकवाड, प्राचार्य प्रा. चिंचले, प्रा खैरे, प्रा. कोकणे, क्र ीडाशिक्षक भागवत, पैठणकर, वखारे, प्रा. बोराडे यांंनी अभिनंदन केले.
स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचे कराटे स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 18:20 IST