पे अ‍ॅण्ड पार्कला स्थगिती; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:38 AM2018-09-25T00:38:46+5:302018-09-25T00:39:05+5:30

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कॅन्टोमेंन्ट प्रशासनाकडून शहरात सुरू करण्यात आलेल्या पे अ‍ॅन्ड पार्कला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर स्थगिती देण्यात आली

 Suspension of Pay and Park; CCTV cameras are implemented | पे अ‍ॅण्ड पार्कला स्थगिती; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

पे अ‍ॅण्ड पार्कला स्थगिती; सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

Next

देवळाली कॅम्प : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कॅन्टोमेंन्ट प्रशासनाकडून शहरात सुरू करण्यात आलेल्या पे अ‍ॅन्ड पार्कला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर स्थगिती देण्यात आली असली तरी वाहनतळांवर नऊ कॅमेरे कार्यान्वित करून त्यावर होणाºया खर्चाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.  शुक्रवारी व्यापाºयांनी पे अ‍ॅण्ड पार्कच्या विरोधात बंद पाळून मोर्चा काढल्यानंतर प्रशासनाने पार्किंग वसुलीला तूर्त स्थगिती दिली आहे. मात्र या पे अ‍ॅण्ड पार्कच्या ठिकाणी सीटीटीव्ही कॅमेरे कायम ठेवण्यात आले आहेत. व्यापाºयांच्या मते जर पे अ‍ॅण्ड पार्कला स्थगिती देण्यात आली तर कॅमेºयावर अनाठायी खर्च का केला जात आहे. सदर पार्किंगबाबत नागरिकांसह व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. कॅन्टोंमेंट बोर्डाने पोलीस स्टेशन समोरील मैदानात चार, आठवडे बाजार मैदानात चार तर व्यापारी संकुलनाच्या मागील मैदानात एक असे तीन ठिकाणी नऊ कॅमेरे शुक्रवारी लावले आहेत.
देवळालीत नागरी सुविधांचा अभाव असताना कॅन्टोमेंन्ट प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असून, अधिकारी, लोकप्रतिनिधींंचा हट्टाहासामुळे सरकारी तिजोरीतून खर्च केला जातो. व्यापारी वर्गाचा पे अ‍ॅण्ड पार्कला विरोध असताना नाहक खर्च करण्याचे कारण काय?  - नितीन गायकवाड, व्यापारी

Web Title:  Suspension of Pay and Park; CCTV cameras are implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.