शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

११ कोटींचा मोबदला देण्यास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:57 IST

शिवाजीवाडी येथील गोठ्यांच्या आरक्षित भूखंडासाठी ११ कोटी रुपयांचा मोबदला देण्यावरून महापालिकेच्या महासभेत बराच गदारोळ झाला. यासंदर्भात नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिलेल्या आक्षेपांची छाननी करून मगच मोबदला अदा केला जाईल...

नाशिक : शिवाजीवाडी येथील गोठ्यांच्या आरक्षित भूखंडासाठी ११ कोटी रुपयांचा मोबदला देण्यावरून महापालिकेच्या महासभेत बराच गदारोळ झाला. यासंदर्भात नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिलेल्या आक्षेपांची छाननी करून मगच मोबदला अदा केला जाईल, असे आश्वासन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.२५) दिले. त्यानंतरच या वादग्रस्त विषयाला विराम मिळाला.महापालिकेच्या वतीने शिवाजीवाडी येथे गोठ्यांसाठी आरक्षित जागा असून, पंधरा वर्षांपासून त्याचा मोबदला देण्याचा विषय प्रलंबित आहे. आता न्यायालयाच्या आदेशाने संबंधित जागा मालकाला ११ कोटी ४३ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव असला तरी त्यास भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आक्षेप घेतला होता. एकीकडे महापालिका शहरातील गोठ्यांना हद्दीबाहेर स्थलांतरित करीत असताना दुसरीकडे गोठ्यांसाठी भूसंपादन करण्याचे कारण काय असा आक्षेप त्यांनी घेतला होता. मंगळवारी (दि.२५) महासभेत हा विषय त्यांनी उपस्थित केला.भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपये दिले जात असल्याने नगरसेवक मुकेश शहाणे व योगेश शेवरे यांनी प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी फ्लेक्स बॅनर घालून महासभेत उभे राहिले; त्यांनी शहरातील भूसंपादनासाठी न्यायालयाचा कोणताही सक्षम आदेश नसताना केवळ कोणावर तरी कृपादृष्टी करण्यासाठी ११ कोटी ४३ लाख रु पये देण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. नगरसेवक प्रशांत दिवे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गजानन शेलार यांच्यासह काही नगरसेवकांनी भूसंपादाच्या नावाखाली आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे निमित्त करून कोट्यवधी रुपये देण्याचा प्रशासनाचा हा डाव आहे, तो कदापि सहन केला जाणार नाही, असे आरोप केले. अजय बोरस्ते, चंद्रकात खोडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक