शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातील आठ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:36 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुन्हा एकदा तालुका आढावा बैठका सुरू केल्या असून, मंगळवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या एकत्रित झालेल्या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी कामकाज समाधानकारक नसलेल्या आरोग्य विभागातील आठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. सर्व संबंधितांच्या निलंबनाचे आदेश तत्काळ ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले.

ठळक मुद्देगिते यांची कारवाई तालुका आढावा बैठकीप्रसंगी केली निर्णय

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुन्हा एकदा तालुका आढावा बैठका सुरू केल्या असून, मंगळवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या एकत्रित झालेल्या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी कामकाज समाधानकारक नसलेल्या आरोग्य विभागातील आठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. सर्व संबंधितांच्या निलंबनाचे आदेश तत्काळ ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले.नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्याची एकत्रित आढावा बैठक महिरावणी येथील दामोदर सभागृहात घेण्यात आली. आरोग्य विभागाचा आढावा घेताना डॉ. गिते यांना गरोदर माता नोंदणी, मातृत्व अनुदान वाटप यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या योजनेत काही ठिकाणी अतिशय कमी काम असल्याचे आढळून आले. जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सूचना देऊनही कामात प्रगती नसल्याने जातेगाव आरोग्य केंद्रातील पर्यवेक्षक राजेंद्र भानुसे, एकनाथ वाडे, शिंदे येथील आरोग्य पर्यवेक्षिका, लहवित येथील आरोग्य पर्यवेक्षक, आंबोली येथील आरोग्य पर्यवेक्षक श्रीमती पाटील, जलालपूर येथील गैरहजर आरोग्य सेविका, रोहिले येथील आरोग्य पर्यवेक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले. शिंदे आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका यांनाही सेवेतून कमी करण्याचे निर्देश देण्यात आले.पोषण आहार अभियानातही जिल्ह्णाचे काम जोरात सुरू असून, आतापर्यंत जिल्हा देशात पुढे आहे. पोषण आहार, स्वच्छता हीच सेवा यामध्ये जिल्हा देशात पुढे राहील व नाशिक जिल्ह्णाची चर्चा सर्वत्र होईल यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी दिल्या.आढावा बैठकीत पोषण आहार अभियानाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. गिते यांनी कुपोषण, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ सर्वेक्षण यामध्ये देशभरात नाशिकच्या कामाची चर्चा होत असून, जिल्ह्णात राबविण्यात येणाºया विविध योजनांमध्ये जोमाने काम सुरू आहे. सर्व योजनांमध्ये जिल्हा अव्वल करावयाचा असून, सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य