शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 16:11 IST

मृत्यूचे नेमके कारण अद्यापतरी पुढे आलेले नाही. याप्रकरणात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची नेमकी काय भूमिका असेल? याकडे आता लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देआत्महत्त्या केल्याचीही चर्चा आडगाव पोलीस ठाण्याच्या वर्तुळात पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर बेशुध्दावस्थेत वरिष्ठ पोलीस निरिक्षकांविरूध्द दिली होती तक्रार

नाशिक : आडगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस मनीषा गोसावी (३५,रा. अयोध्या अपार्टमेंट, जेलरोड) या रविवारी (दि.२९) दुपारी पोलीस ठाण्याकडे येत असताना नांदूरनाका परिसरात बेशुध्दावस्थेत नागरिकांना आढळून आल्या. जागरूक नागरिकांनी तत्काळ त्यांना उचलून जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापतरी पुढे आलेले नाही. याप्रकरणात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची नेमकी काय भूमिका असेल? याकडे आता लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शहराच्या दौ-यावर प्रथमच येत असताना ही घटना घडल्याने गांभीर्य अधिकच वाढले आहे.जिल्हा शासकिय रूग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर खरे कारण पुढे येईल; मात्र गोसावी यांनी आत्महत्त्या केल्याचीही चर्चा आडगाव पोलीस ठाण्याच्या वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.आडगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून नोकरीस असलेल्या गोसावी या मागील आठवडाभरापासून रजेवर होत्या. दरम्यान, त्या रविवारी पोलीस ठाण्याकडे येत असताना अचानकपणे रस्त्यालगत दुचाकी उभी करून थांबल्या आणि बेशुध्दावस्थेत नागरिकांना आढळून आल्या. नागरिकांनी पोलीस असल्याचे ओळखून तत्काळ त्यांना जवळच्या रूग्णालयात हलविले; मात्र तत्पुर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, महिला पोलीस शिपायाच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे. ही महिला आडगाव पोलीस ठाणे अंकीत नांदूरनाका पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर बेशुध्दावस्थेत नागरिकांना दिसून आली. दरम्यान, याबाबत पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महिला शिपाई या मागील२० तारखेपासून रजेवर होत्या. त्यांनी आठवडाभरापुर्वी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांविरूध्द तक्रारदेखील दिली होती. यामुळे सहायक पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर चौकशी अहवाल माझ्याकडे सोपविला. त्यानुसार खुलासे घेण्याचे काम सुरू होते.एकूणच या सगळ्या प्रकरणावरून महिला पोलीस शिपायाने काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या तर केली नसावी? असा संशयदेखील व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिलाDeathमृत्यू