शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

जंगलातून पळालेल्या मोरांना मातोरीत जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 6:07 PM

डोंगराळ भागातील पशु-पक्षी व जनावरे मानवी वस्तीकडे पाण्यासाठी वळू लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु मातोरी येथे वन्य पशु-पक्ष्यांची गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. काही दिवसांपूर्वीच मातोरी गावातील डोंगरावरील जंगलाला अचानक आग लागल्याने आगीपासून

ठळक मुद्देआगीमुळे शेताकडे धाव : शिकाऱ्यांना गावबंदीचे फर्मान पशु-पक्षी व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्किल

लोकमत न्यूज नेटवर्कमातोरी : ग्रामीण भागात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पशु-पक्षी व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत काही दिवासांपूर्वी मातोरी नजीकच्या डोंगराला लागलेल्या आगीमुळे जीव वाचवून पायथ्याशी पळालेल्या पशु-पक्ष्यांसाठी गावातील शंकर पिंगळे यांनी पिण्याचे पाणी व खाद्याची व्यवस्था केल्याने दररोज शेकडो मोर व विविध पक्षी याठिकाणी आश्रयास येत आहेत.

डोंगराळ भागातील पशु-पक्षी व जनावरे मानवी वस्तीकडे पाण्यासाठी वळू लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु मातोरी येथे वन्य पशु-पक्ष्यांची गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. काही दिवसांपूर्वीच मातोरी गावातील डोंगरावरील जंगलाला अचानक आग लागल्याने आगीपासून बचावासाठी तेथील पशु- पक्ष्यांनी अन्यत्र स्थलांतर केले. तर काहींनी पायथ्याशी असलेल्या शेतजमिनीकडे धाव घेतली. नेमकी हीच बाब शंकर पिंगळे या शेतकºयाच्या निदर्शनास आली. पिण्याचे पाणी व खाद्यासाठी अनेक पक्षी फिरत असल्याचे पाहून पिंगळे यांनी आपल्या शेतातच प्रारंभी पाण्याची व खाद्याची सोय केली. सुरुवातीला दोन-चार दिवस त्याला प्रतिसाद मिळाला नाही, मात्र त्यानंतर दररोज सकाळी पक्ष्यांचे थवेच्या थवे याठिकाणी येऊ लागले. विशेष करून त्यात मोरांची संख्या अधिक असून, सकाळी पाणी व खाद्यासाठी येणारे हे पक्षी दिवसभर मात्र अन्यत्र जात असले तरी, सायंकाळनंतर पुन्हा शेतात परतू लागले आहेत. त्यांची संख्या पाहता, पिंगळे यांनी मळ्याच्या शेजारी मोरांना पिण्यासाठी टाकी भरून ठेवली, त्याचबरोबर खाद्य म्हणून दाणे, वाळलेली द्राक्षे, धान्य आदी वस्तू ठेवल्या आहेत. त्यामुळे या पक्ष्यांना सदरचा भाग सुरक्षित वाटू लागला आहे. विशेष म्हणजे विविध जाती-प्रजातींच्या पक्ष्यांचे जतन करण्यासाठी मातोरी गावात शिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.----डोंगराला अचानक आग लागल्याने मळ्यात काही मोर दिसले. त्यांच्या अन्न-पाण्याची गरज लक्षात आली त्यामुळे त्यांना गहू, द्राक्ष मनुके तसेच पाण्याची सोय केली. ते कोठेही दूरवर गेले तरी पाण्यासाठी व अन्नासाठी येथे येतात. त्यांच्यासाठी शेडची सोय केली असून, रात्री तेथे येऊन बसतात.

टॅग्स :WaterपाणीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार