दिंडोरी : सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात सहकारी कर्मचाऱ्याकडून बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या.ही कारवाई नाशिक शहरातील मेरी लिंक रोड भागात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दामू कळसाईत असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. संशयित मुख्याध्यापक आणि तक्रारदार हे दोघेही पिंपरखेड शासकीय आश्रमशाळेत कार्यरत आहेत. तक्रारदार यांना काही दिवसांपूर्वीच सातवा वेतन आयोगाचा फरक मिळाला. या कामासाठी मदत केल्याचा दावा करीत मुख्याध्यापक कळसाईत याने बक्षीस म्हणून सहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर मेरी लिंक रोड भागात प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
सहकाऱ्याकडून बक्षिसी भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 22:37 IST
दिंडोरी : सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात सहकारी कर्मचाऱ्याकडून बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
सहकाऱ्याकडून बक्षिसी भोवली
ठळक मुद्देपिंपरखेड आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात