शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या मागणीसाठी भुजबळ यांच्या वाहनाला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 22:46 IST

लासलगाव : ह्यआमदारांना घरे देता; मग आम्हाला का नाही?ह्ण असा सवाल करीत येथील संजयनगरमधील झोपडपट्टीवासीयांनी राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वाहन अडवीत गराडा घातला. अचानक घडलेल्या प्रकारांमुळे भुजबळदेखील आश्चर्यचकित झाले होते.

ठळक मुद्देलासलगावचा प्रकार : झोपडपट्टीवासीय आक्रमक

लासलगाव : ह्यआमदारांना घरे देता; मग आम्हाला का नाही?ह्ण असा सवाल करीत येथील संजयनगरमधील झोपडपट्टीवासीयांनी राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वाहन अडवीत गराडा घातला. अचानक घडलेल्या प्रकारांमुळे भुजबळदेखील आश्चर्यचकित झाले होते.गेल्या आठवड्यात अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असल्याचे जाहीर केले होते. यावर सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार जरी झाला असला तरी सत्ताधारी मंत्र्यांना या निर्णयाच्या विरोधात तोंड देण्याची नामुष्की ओढवली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेच्या विरोधात उमटलेल्या पडसादाला सामोरे जाण्याची वेळ पालकमंत्री भुजबळ यांच्यावर लासलगावी आली.

भुजबळ हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना लासलगाव येथे शिलाई मशीन वाटप व रस्ता सुधारणा कामाच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर नाशिककडे रवाना होत असताना लासलगाव येथील संजयनगरमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीतील रहिवाशांनी त्यांची गाडी अडवत घेराव घातला.

आम्ही सुद्धा तुम्हाला भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी मत दिल्याची आठवण करून देत आमदारांना राज्य शासन घरे बांधून देणार आहे; मग आम्हाला का नाही? असा सवाल महिला व पुरुषांनी भुजबळ यांना केला. अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे पालकमंत्री भुजबळ काही क्षण निरुत्तर झाले होते. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळStrikeसंप