शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यम...! भुरट्या चोराने कारमधून गायब केले २५ लिटर पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 16:03 IST

चोरट्याने त्यांच्या कारच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पेट्रोलने भरलेली टाकी पुर्णपणे रिकामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नाशिक : दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या घटना या अद्याप कानी येत होत्या; मात्र लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये एक आश्चर्यचकित चोरीची भर पडली आहे. भुरट्या चोरट्याने एका कारमधून पेट्रोल चोरी करण्याची शक्कल लढविली अन् एक दोन नव्हे तर तब्बल २५ लिटर पेट्रोल चोरी केल्याची घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशाी, उपनगर येथील तरणतलावाजवळ जयंत नामदेवराव फुलकर ( ५७) यांनी त्यांचे चारचाकी वाहन उभे केले होते. चोरट्याने त्यांच्या कारच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पेट्रोलने भरलेली टाकी पुर्णपणे रिकामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भुरट्या चोराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. चारचाकीमधून पेट्रोल गायब करण्यापर्यंत भुरट्या चोऱ्या आता शहरात घडू लागल्याने नागरिकांनी त्यांच्या दारापुढे चारचाकी वाहने उभी करणेही धोकादायक झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहने गायब करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेलेली आहे; मात्र या अज्ञात भुरट्या चोराने केवळ कारच्या इंधनावरच डल्ला मारत सुमारे दोन हजार रूपयांचे पेट्रोल गायब केले. लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून लहान-मोठ्या चोरीच्या घटनांसह घरफोड्यांमध्येही वाढ झाली आहे.याप्रकरणी पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी