शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सुरगाणा धान्य घोटाळा : पोलिसांच्या कृपेने आरोपी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:53 IST

राज्यात गाजलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांचे धान्य घोटाळ्यातील तीन आरोपी पोलिसांच्या कृपेने अजूनही मोकळे फिरत आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नऊ महिन्यांपूर्वी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याची बाब राज्याच्या पुरवठा मंत्र्यांसमक्ष उघडकीस येऊन व आरोपींना चोवीस तासांत अटक करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पोलिसांचा आरोपींवरील कृपेची ‘अर्था’तच चर्चा होऊ लागली आहे.

ठळक मुद्देसुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांचे धान्य घोटाळापोलिसांचा आरोपींवरील कृपेची ‘अर्था’तच चर्चाआरोपींना २४ तासांत अटक करण्याचे आदेश

नाशिक : राज्यात गाजलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांचे धान्य घोटाळ्यातील तीन आरोपी पोलिसांच्या कृपेने अजूनही मोकळे फिरत आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नऊ महिन्यांपूर्वी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याची बाब राज्याच्या पुरवठा मंत्र्यांसमक्ष उघडकीस येऊन व आरोपींना चोवीस तासांत अटक करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पोलिसांचा आरोपींवरील कृपेची ‘अर्था’तच चर्चा होऊ लागली आहे.  दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या धान्य घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अन्नधान्य महामंडळातून निघणारे रेशनचे धान्य प्रत्यक्षात सुरगाण्याच्या शासकीय गुदामात न जाता ते वाहतूक ठेकेदाराच्या मदतीने काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात होते. तब्बल सव्वा वर्षे चाललेल्या या घटनेत शासनाचे सव्वासात कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याची बाब गुदाम तपासणीत उघडकीस आली होती. तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २४ संशयितांविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याचा तपास पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाºयाकडे सोपविण्यात आला होता. राज्यभर गाजलेल्या या घटनेची दखल घेत राज्य सरकारने जिल्ह्णातील सात तहसीलदारांसह तेरा जणांना निलंबितही करण्यात आले होते. सदरचा गुन्हा घडून दोन वर्षे झाली असून, यातील तीन आरोपी वगळता अन्य आरोपींविरुद्ध पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्रही दाखल केले, परंतु या गुन्ह्णातील मुख्य सूत्रधार व वाहतूक ठेकेदार मोरारजी भिकुलाल मंत्री, संजय रामकृष्ण गडाख व दीपक पारसमल पगारिया हे तिघेही अद्याप मोकाट फिरत आहेत. या तिघांनीही अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आदेश धुडकावला  पोलिसांना अद्यापही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याचे माहिती नसल्याची बाब दोन दिवसांपूर्वी नाशिक भेटीवर येऊन गेलेल्या अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या समक्ष उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मंत्र्यांच्या उपस्थितीत या साºयाप्रकरणाची जाहीर वाच्यता झाल्यानंतर बापट यांनी आरोपींना २४ तासांत अटक करण्याचे आदेश दिले; परंतु अद्यापही पोलिसांनी आरोपींना हात लावलेला नाही. या संदर्भात पुरवठा खात्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. तथापि, पोलिसांनी इतक्या गंभीर प्रकरणात दाखविलेल्या हलगर्जीपणाबद्दल उलटसुलट  चर्चा होत आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय