शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशदादा तळवलकर यांच्या झपतालाने श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:38 IST

सतारीच्या सुरांना लाभलेली संवादिनी अन् तबल्याच्या साथीने एकापेक्षा एक सरस राग सादरीकरणाने रंगलेल्या आवर्तन संगीत सोहळ्यात पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांनी आपल्या खास शैलित सादर केलेल्या झपतालाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

नाशिक : सतारीच्या सुरांना लाभलेली संवादिनी अन् तबल्याच्या साथीने एकापेक्षा एक सरस राग सादरीकरणाने रंगलेल्या आवर्तन संगीत सोहळ्यात पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांनी आपल्या खास शैलित सादर केलेल्या झपतालाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  निमित्त होते, श्री गुरुकृपा तबला अकादमी व एसडब्ल्यूएस फायनान्सियल सोल्युशनच्या संयुक्त विद्यमाने गंगापूररोडवरील शंकराचार्य सभागृहात दोन दिवसीय ‘आवर्तन’ या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन शनिवारी (दि.२८) सकाळी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळवलकर, पंडित विजूकाका हिंगणे, पंडित कमलाकर वारे, अविराज तायडे, जयंत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्रात वादक स्वीकार कट्टी यांनी सतारवादनातून ‘मियां की तोडी’ हा शास्त्रीय संगीतामधील राग खास शैलित सादर केला. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर साथ केली. त्यानंतर पं. योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव यांनी एकल तबलावादनातून तीनतालात पेशकार कायदे व बंदिशी सादर केल्या. संध्याकाळच्या सत्राचा प्रारंभ अकादमीच्या विद्यार्थ्यांनी तबल्याच्या सहवादनाने केला. विद्यार्थ्यांनी यावेळी तीनताल सादर केला. तळवलकर यांनी त्यांचे सहकारी सावनी तळवलकर-गाडगीळ, नागेश आडगावकर, मिलिंद कुलकर्णी, ओंकार दळवी यांच्या साथीने झपताल सादर केला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी सुरेशदादा तळवलकर यांच्या या प्रस्तूतीला उत्स्फूर्त दाद दिली.आज बनारस घराण्याचे तबलावादनरविवारी (दि.२९) सकाळी पहिल्या सत्रात बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबला सम्राट पंडित किशन महाराज यांचे नातू शुभ महाराज हे एकल तबलावादन सादर करणार आहे. आवर्तनाच्या दुसऱ्या अन् अखेरच्या सत्राचा समारोप दिल्लीचे उस्ताद राशीद मुस्तफा व शारीक मुस्तफा यांच्या तबला वादनाने होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक