शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्याला ३३ तासांत २२६ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:02 IST

नाशिक : जिल्ह्णात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्याला गेल्या ३३ तासांत चांगलेच झोडपून काढले आहे. या काळात २२२६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४५१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, दुपारनंतर मात्र पावसाने ग्रामीण भागात उघडीप दिली ...

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वत्र हजेरी : धरणसाठ्यातही वाढ

नाशिक : जिल्ह्णात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्याला गेल्या ३३ तासांत चांगलेच झोडपून काढले आहे. या काळात २२२६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४५१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, दुपारनंतर मात्र पावसाने ग्रामीण भागात उघडीप दिली आहे.बुधवारी सकाळपासून पावसाने नाशिक शहरासह ग्रामीण भागातही जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, दुबार पेरणीचे ठाकलेले संकट दूर होण्यास या पावसामुळे मदत झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सलग पडलेल्या पावसामुळे नद्या, नाल्यांना काही प्रमाणात पाणी आल्याने जिल्ह्यातील धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४५१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक १०४ मिलिमीटर इतका तर त्या खालोखाल इगतपुरी येथे ९६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पेठ तालुक्यात ९५ तर त्र्यंबकेश्वरला ५९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामानाने अन्य तालुक्यांना जेमतेम पाऊस नोंदविला गेला. गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरगाणा येथे अतिवृष्टी होऊन १२२ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. या पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागाचा संपर्क तुटला असून, नद्या, नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहरात दिवसभर अधून-मधून पावसाची हजेरी कायम होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात ३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊस