The support of the destitute will be available in the shelter of Sheep | मेंढीच्या शिवाश्रमात मिळणार निराधारांना आधार
मेंढीच्या शिवाश्रमात मिळणार निराधारांना आधार

सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील मेंढी येथे शिवाश्रमाच्या उभारणींसाठी आयोजित बैठक शिर्डी येथील हॉटेल निसर्ग येथे पार पाडली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक मधुकर गिते, साई आदर्श मल्टिस्टेट बॅँकेचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, उद्योजक मुकुंद सिनगर उपस्थित होते. शिवाश्रमासाठी मधुकर गिते यांनी ५० गुंठे जागा दान दिली असून, येत्या २३ मार्चला त्या ठिकाणी शिवाश्रमाची पायाभरणी करून बांधकामास प्रारंभ होणार असल्याचे डॉ. तनपूरे यांनी सांगितले. सर्वाेतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थितांच्या वतीने मधुकर गिते व त्यांच्या पत्नी शिला गिते यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक शिवनाथ कापडी, छावा संघटनेचे विलास दळवी, दत्तात्रय पानसरे, प्रेरणा मंडळाचे अध्यक्ष पी. आर. बेलोटे, मुकुंद सिंगर, मधुकर गिते यांनी मार्गदर्शन केले.


Web Title:  The support of the destitute will be available in the shelter of Sheep
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.