शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर शहर-उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:28 IST

सिन्नर शहर व लगतच्या उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत नाशिकच्या सिन्नर शाखेने केली आहे. तशा आशयाचे निवेदन सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांना ईमेलद्वारे देण्यात आले.

ठळक मुद्देग्राहक पंचायतीची मागणी : ईमेलद्वारे दिले निवेदन

सिन्नर : सिन्नर शहर व लगतच्या उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत नाशिकच्या सिन्नर शाखेने केली आहे. तशा आशयाचे निवेदन सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांना ईमेलद्वारे देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, सिन्नर शहर व लगतच्या उपनगरातील लोकसंख्या वाढत आहे, त्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. पाणीपुरवठा हा सर्वांचा जिव्हाळ्याचा तसेच ज्वलंत प्रश्न आहे. सध्या शहरात दोन दिवसाआड तर उपनगरात तीन-चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. सर्वांनाच सारखीच पाणीपट्टी आहे. मग असा भेदभाव का? असा प्रश्न नागरिक करताना दिसत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच लॉकडाउनमुळे सर्वच माणसं घरातच तळ ठोकून आहेत. सर्वच कामकाज व दैनंदिन जीवनचक्र ठप्प झाले आहे.कडवा धरणात पाण्याचा पुरेसा साठा असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाउन, संचारबंदीच्या काळात रोज नाहीतर कमीतकमी दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर दत्ता शेळके, श्यामसुंदर झळके, विश्वनाथ शिरोळे व इतर पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.कोरोना विरुद्धच्या लढाईत शासन, पोलीस, आरोग्य व इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था सतर्क झाल्या असून डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच सफाई कामगार जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहे. त्यांच्या कार्याची प्रशंसा केलीच पाहिजे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी घरातच सुरक्षित राहणे व स्वत:बरोबर कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर तसेच वारंवार साबणाने हात स्वच्छ करणे, यामुळे अतिरिक्त पाण्याचा वापर दुपटीने वाढला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात