शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या अनुत्तीर्णांसाठी १७ जुलैपासून पुरवणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:41 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व  उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान तर १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थांना विलंब शुल्कासह अर्ज करण्याची संधी संपली असली तरी विद्यार्थ्यांना अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क भरून परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

ठळक मुद्दे17 जुलैपासून दहावी ,बारावीची पुरवणी परीक्षाविद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासोबतच गुणवत्ता सुधारण्याची संधी

नाशिक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व  उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान तर १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थांना विलंब शुल्कासह अर्ज करण्याची संधी संपली असली तरी विद्यार्थ्यांना अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क भरून परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यात नियमित अंतिम मुदत २४ जून व विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत २७ जूनला संपुष्टात आली असून, अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत सोमवार, दि. १ जुलै रोजी संपली आहे. आता विद्यार्थ्यांना विशेष अतिविलंब शुल्कासह ८ ते १२ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिदिन १०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार असून, त्यानंतरही अतिविशेष अतिविलंब शुल्कासह थेट परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु त्यासाठी प्र्रतिदिन २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत. यापूर्वी नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण, तर २४ हजार ३०९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. दहावीच्या १ लाख ८९ हजार ७५० पैकी १ लाख ५४ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ३५ हजार ५५७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. दोन्ही मिळून ५९ हजार ८६६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे. याशिवाय उत्तीर्ण झालेले मात्र श्रेणी सुधार करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनाही परीक्षेला प्रविष्ट होता येणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थी