शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारपासून ‘सुन्नी इज्तेमा’ : पैगंबरांच्या शिकवणीसह धार्मिक साहित्यावर होणार विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 16:56 IST

मनपाच्या पश्चिम विभागाकडून सुविधा पुुरविण्यास असमर्थता दर्शविली गेली आणि चक्क एका खासगी ठेकेदाराशी संपर्क करण्याची सुचना त्या पत्राला उत्तरात करण्यात आली.

ठळक मुद्देरविवार (दि.२६) पुरूषांसाठी राखीव मेळाव्याच्या ठिकाणाला ‘वादी-ए-सादीक’ असे नावसुफी संतांच्या विचारांचे आदानप्रदान

नाशिक :इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी समाजाला दिलेली मानवतेच्या शिकवणीचा प्रसार-प्रचार व्हावा तसेच धार्मिक साहित्य आणि सुफी संतांच्या विचारांचे आदानप्रदान होऊन वैचारिक मंथन घडावे, या उद्देशाने सालाबादप्रमाणे यंदाही सुन्नी दावत-ए-इस्लामी या धार्मिक संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने दोनदिवसीय विभागीय स्तरावरील मेळावा (सुन्नी इज्तेमा) आयोजित केला आहे. शनिवारपासून मेळाव्याला प्रारंभ होणार असून पहिला दिवस महिलांसाठी राखीव असेल अशी माहिती संयोजकांनी दिली.सुन्नी दावते इस्लामी ही राष्ट्रीय मुस्लीम धार्मिक संघटना असून वर्षभर विविध जिल्ह्यांत या संघटनेच्या वतीने धार्मिक मेळावे आयोजित केले जातात. याअंतर्गत नाशिक विभागासाठी शनिवारपासून दोनदिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्र्यंबकरोडवरील शहाजहॉँनी इदगाह मैदानावर हा मेळावा पार पडणार आहे. मेळाव्याचे हे सोळावे वर्ष आहे. मेळाव्याच्या ठिकाणाला ‘वादी-ए-सादीक’ असे नाव देण्यात आले आहे. मेळ्याव्यासाठी इस्लामधर्मीय सुन्नी पंथाचे ज्येष्ठ धर्मगुरू हजेरी लावणार आहे. यामध्ये मुफ्फकिर-ए-इस्लाम हजरत मौलाना कमरूज्जमा खान आजमी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शाकीर अली नुरी, हाश्मीया विद्यालयाचे प्राचार्य मौलाना कारी रिजवान खान, हजरत मौलाना सय्यद अमिनुल कादरी यांच्यासह स्थानिक धर्मगुरू तसेच शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. रविवार (दि.२६) पुरूषांसाठी राखीव असून रात्री दहा वाजता सामुहिक दुवापठणाने मेळाव्याचा समारोप करण्यात येणार आहे.मनपाने दिला खासगी ठेकेदाचा ‘संपर्क’मागील सोळा वर्षांपासून मनपा प्रशासनाकडून मेळाव्याच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, मैदानाचे सपाटीकरणासारखी सुविधा पुरविल्या जात होत्या. यंदाही या सुविधांची मागणी करणारे पत्र संघटनेकडून मनपाला देण्यात आले होते; मात्र मनपाच्या पश्चिम विभागाकडून सुविधा पुुरविण्यास असमर्थता दर्शविली गेली आणि चक्क एका खासगी ठेकेदाराशी संपर्क करण्याची सुचना त्या पत्राला उत्तरात करण्यात आली. यामुळे संयोजकदेखील चक्रावले. खासगी ठेकेदारांच्या ‘मार्केटिंग’ची जबाबदारी मनपा प्रशासनाकडून घेतली गेली की काय? असा प्रश्न उपस्थित करणण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकMuslimमुस्लीमIslamइस्लाम