शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा : नाशिकच्या ‘देवराई‘वरील रोपट्यांना हवी तरुण हातांची ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:26 IST

आपलं पर्यावरण संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे; मात्र काही स्वयंसेवक उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर स्थायिक झाल्याने मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे.

ठळक मुद्दे संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन बोटावर मोजण्याइतक्या स्वयंसेवकांची धडपडवनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेने संयुक्तरीत्या ३४ महिन्यांपूर्वी वनमहोत्सव राबविला

नाशिक : नाशिकच्या ‘देवराई’द्वारे हरित भविष्य साकारण्यासाठी ५ जून २०१५ रोजी हजारो आबालवृद्ध नाशिककर सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर (फाशीचा डोंगर) आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र आले होते. वनमहोत्सवातून त्यावेळी तब्बल ११ हजार रोपांची लागवड झाली. तीन वर्षांत रोपांचीही चांगली वाढ झाली असून, किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिककरांना रोपांच्या संवर्धनाची काळजी घ्यावीच लागणार आहे. मार्चचा अखेरचा आठवडा सुरू असून, सूर्य तळपू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. देवराईला तरुण हातांची प्रतीक्षा कायम असून, दर रविवारी तरुणाईने देवराईकडे पाऊल वळवून हरित नाशिकसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न क रणे आवश्यक आहे.वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेने संयुक्तरीत्या ३४ महिन्यांपूर्वी वनमहोत्सव राबविला. या वनमहोत्सवाला नाशिककरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसादामुळे दहा हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होऊन एक हजार अतिरिक्त रोपे लावण्यात आली. नाशिककरांनी एकाच दिवशी ११ हजार रोपांची लागवड यशस्वीपणे करून दाखविल्याने हा ‘नाशिक पॅटर्न’शासनाचा लक्षवेधी ठरला. ‘देवराई’निर्मितीचा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे धोरण वन मंत्रालयाने घेत ५० कोटी झाडे लागवडीचा संकल्प सोडला.आपलं पर्यावरण संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे; मात्र काही स्वयंसेवक उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर स्थायिक झाल्याने मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे. वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण विभागाकडूनही आठवड्यातून एक दिवस तरी या ठिकाणी वनमजुरांना पाचारण करण्याची मागणी होत आहे.

बोटावर मोजण्याइतक्या स्वयंसेवकांची धडपडबोटावर मोजण्याइतके स्वयंसेवक वीकेण्डला येथे चार ते पाच तास श्रमदान करून जगलेल्या रोपांना वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न क रत आहेत. महाविद्यालयीन तरुणांचे ग्रुप व विविध शाळा-महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना, हरित सेना, स्काउट-गाइड दलाचे विद्यार्थ्यांनी दर शनिवार, रविवारी देवराईला भेट देऊन श्रमदान के ल्यास येथील हजारो रोपांची अधिक वेगाने वाढ होण्यास मदत होईल. मार्च अंतिम टप्प्यात आला असून, पुढील दोन महिने प्रखर ऊन पडणार असून तपमानात वाढ होणार आहे. त्यामुळे आता रोपांना पाणी देण्याची गरज अधिक वाढली आहे; कारण सूर्य तळपू लागला असून, उन्हाची तीव्रता वाढत आहे.

टॅग्स :NashikनाशिकNatureनिसर्गenvironmentवातावरण