शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

सुलोचनादिदींना दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मागणीसाठी नाशिकमध्ये स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:57 IST

चित्रपट सृष्टीचे भिष्माचार्य दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी यांना देण्यात यावा अशी मागणी नॅशनल युनियन आॅफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (दि.५) परशूराम सायखेडकर नाट्यगृहच्या आवारात दोन्ही संघटनांतर्फे दिवसभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्दे सुलोचना दिदी यांना दादासाहेब पुरस्कार देण्याची मागणीनाशिकमध्ये चित्रपट महामंडळाच्या शाखेतर्फे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : चित्रपट सृष्टीचे भिष्माचार्य दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी यांना देण्यात यावा अशी मागणी नॅशनल युनियन आॅफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (दि.५) परशूराम सायखेडकर नाट्यगृहच्या आवारात दोन्ही संघटनांतर्फे दिवसभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात सुमारे साडेपाचशे नागरिकांनी या स्वाक्षरी मोहीमेत सहभाह नोंदवून  सुलोचना दिदींना पुरस्कार मिळण्याच्या मागणीचे समर्थन केले. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींनी ४०० हून अधिक हिंदी- मराठी आणि इतर भाषातील सिनेमात कसदार व सशक्त भूमिका साकारलेल्या आहेत. कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यापासून अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत मराठी आणि हिंदी पडद्यावर सुलोचनादीदीचे नाव झळकले. त्यामुळेच त्यांच्या नावाचा आणि कामगिरीचा उल्लेख केल्याशिवाय चित्रपटसृष्टीची वाटचाल अधुरीच राहते. त्यांना यापूर्वी पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण हे सन्मान मिळालेले आहेत. त्याचबरोबर फिल्मफेअरचा लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवार्ड आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये आपले अवघे आयुष्य खर्ची घालूनही त्यांना अद्याप केंद्र शासनाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला नसल्याने नाशिकमध्ये मंगळवारी दिवसभर चित्रपट महामंडळाचे विभागीय अध्यक्ष रवि बारटक्के, रवि साळवे, रफिक सय्यद, राजेश जाधव आदींनी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.  (फोटो-०५पीएचएफबी६१)- सुलोचना दिदी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविताना रवि साळवे, रवि बारटक्के, रफिक ससय्यद आदी 

टॅग्स :cinemaसिनेमाNashikनाशिकSulochana Latkarसुलोचना दीदी