नाशिक : शाळा-महाविद्यालयीन युवक-युवतींवर वाढता ताणतणाव व त्यामधून येणाऱ्या नैराश्यापोटी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. एका १७ वर्षीय युवकाने बापू पूलावरुन गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजस रामदास सांगळे (१७, रा. निसर्गनगर, म्हसरुळ) याने बुधवारी (दि.१२) संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास पूलावरुन गोदापात्रात उडी घेतली. याबाबतची माहिती, मुख्यालयामधून पंचवटी अग्निशामक उपकेंद्राला मिळताच अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. यावेळी पाण्याच रबरी बोट सोडून त्यांनी गोदापात्रात तरुणाचा शोध घेण्यास सुरूवात केली. दोन ते अडीच तास जवानांनी गोदापात्र पिंजून काढल्यानंतर तेजसचा मृतदेह शोधण्यास त्यांना यश आले. तेजसच्या आत्महत्त्येमागील कारण समजू शकले नाही. संदिप रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या खबरवरुन गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास हवालदार शेख करीत आहे.
महाविद्यालयीन युवकाची पूलावरुन गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 18:33 IST
नाशिक : शाळा-महाविद्यालयीन युवक-युवतींवर वाढता ताणतणाव व त्यामधून येणाऱ्या नैराश्यापोटी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. एका १७ वर्षीय युवकाने बापू पूलावरुन गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजस रामदास सांगळे (१७, रा. निसर्गनगर, म्हसरुळ) याने बुधवारी (दि.१२) संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ...
महाविद्यालयीन युवकाची पूलावरुन गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या
ठळक मुद्देसंध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास पूलावरुन गोदापात्रात उडीआत्महत्त्येमागील कारण समजू शकले नाही.