शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

खून करून आत्महत्येचा बनाव आला उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:07 IST

महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून पाच संशयितांच्या टोळक्याने अंबडच्या आशीर्वादनगर भागात एका ४१ वर्षीय इसमाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२९) उघडकीस आला.

सिडको : महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून पाच संशयितांच्या टोळक्याने अंबडच्या आशीर्वादनगर भागात एका ४१ वर्षीय इसमाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२९) उघडकीस आला. संशयितांनी मयतास गळफास घेतल्याप्रमाणे लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात अंबड पोलिसांनी टोळीमधील संशयित गोपाळ शंकर कुमावत व त्याचे वडील शंकर बंडू कुमावत या दोघांना अवघ्या बारा तासांत बेड्या ठोकल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमेश दगा वानखेडे (रा. पांडुरंग कृष्णा रो-हाउस) येथे राहतात. सोमवारी (दि. २८) रात्री रमेश यांनी एका महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून त्याचा येथील काही लोकांशी वाद झाला होता. हाच राग मनात धरून दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. २९) सकाळी यातील संशयित आरोपी गोपाळ शेखर कुमावत, लखन शेखर कुमावत, शेखर बंडू कुमावत व शुभम शेखर कुमावत यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांनी रमेश यास बेदम मारहाण केली.या मारहाणीत रमेश यास गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी रमेशची त्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर रमेश याने घरात गळफास घेतल्याचे येथील काही नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनीच त्याला तत्काळ (एमएच१५,डीएस५३०२) या चारचाकी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रमेशच्या मृतदेहाचे विच्छेदन डॉक्टरांनी केले असता त्याचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अमृत याने याबाबतची माहिती अंबड पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रमेश यांचा भाऊ अमृत दगा वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.भाऊबीजेला भावाची भेट झालीच नाहीमंगळवारी भाऊबीजनिमित्त रमेश, अमृत हे दोघे भाऊ संगमेश्वर येथे बहिणीकडे जाणार होते. भावाने रमेश यास फोन केला असता त्याने फोन न उचलल्याने अमृत हा थेट बहिणीकडे जाण्यासाठी एकटाच निघाला, मात्र अर्ध्या वाटेतच त्याला भाऊ रमेश हा खूप सिरियस असल्याचा फोन आल्याने त्याने पुढील प्रवास रद्द करत जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. भावाची आतुरतेने वाट पाहणाºया बहिणीची भाऊबीजेला भावाची भेट झालीच नाही.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी