शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत चिमुरडीसह मातेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:52 IST

इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन येथे एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडीसह रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन येथे एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडीसह रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.  दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सदर महिलेने वाडीवºहे पोलिसांना आत्महत्या करणार असल्याचे कळवूनही या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्याने पोलिसांच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.  अस्वली स्टेशन येथील विनता वारे (३५) पतीसह गोंदे दुमाला येथे राहात होत्या. या दांपत्याला सोनाली (वय तीन वर्षे) मुलगी होती. मध्यंतरीच्या काळात वारे कुटुंब भातकापणीच्या कामासाठी खोडाळा तालुक्यात गेले होते. तेथे दांपत्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. याबाबत विनता यांनी पोलिसांना माहिती दिली होती. मात्र वाडीवºहे पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर व्यथित झालेल्या महिलेने रविवारी आपल्या तीनवर्षीय चिमुकलीसह स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.  घटनेची पोलिसांना कल्पना असताना, दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असल्याने पोलिसांची चौकशी व्हावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, संजय शिंदे आदींनी केली आहे.काहीकाळ तणावरेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावे तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाडीवºहे पोलिसांची चौकशी करावी, अशी मागणी करत नातलगांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अखेर संध्याकाळी तक्र ार दाखल झाल्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतले.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक