शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

कंपनीमालकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:18 IST

शिखरेवाडी येथील ड्रीम अ‍ॅव्हेन्यू सोसायटीत राहणारे, सिन्नर व पुण्याला कॉपरची कंपनी असलेल्या मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नाशिकरोड : शिखरेवाडी येथील ड्रीम अ‍ॅव्हेन्यू सोसायटीत राहणारे, सिन्नर व पुण्याला कॉपरची कंपनी असलेल्या मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.पुणे- अर्णेश्वर संतनगर येथील स्वामी विवेकानंद सोसायटीत राहणारे सुरेंद्र शंकर साळेकर (४८) यांची पुणे व सिन्नर एमआयडीसीत कॉपरची कंपनी आहे. साळेकर यांचा शिखरेवाडीतील ड्रीम अ‍ॅव्हेन्यू सोसायटी बी- विंग-३०२ हा फ्लॅट असून, तेथे ते एकटे राहत होते. साळेकर यांच्याकडे जीएसटी मोठ्या प्रमाणात थकल्याने जीएसटी विभागाचे पथक सोमवारी सिन्नर येथील कंपनीत जाऊन तेथून तपास करत शिखरेवाडीतील ड्रीम अ‍ॅव्हेन्यू सोसायटीत आले. साळेकर यांच्या फ्लॅटचा दरवाजा अनेकवेळा ठोठावूनदेखील कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. पथकाने सुरक्षारक्षक व आजूबाजूचे रहिवासी यांच्या मदतीने साळेकर यांचा फ्लॅटचा दरवाजा तोडला असता हॉलमध्ये छताच्या पंख्याला दोरी बांधून काही तासांपूर्वीच साळेकर यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. साळेकर यांनी आर्थिक कारणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.आनंदनगरला टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्लानाशिकरोड : आनंदनगर कदम लॉन्सजवळील साईबाबा मंदिराजवळ युवकावर टोळक्याने प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.जयभवानीरोड आडकेनगर येथे राहाणारा उद्देश अनिलसिंग चंदेल याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्र साहील म्हस्के याच्यासोबत रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास साईबाबा मंदिराजवळील उद्यानामध्ये दारू पित बसले होते. यावेळी संशयित विजय बहेनवाल उर्फ चंग्या (रा. फर्नांडीसवाडी), मारी घोरपडे, बडे, गणेश सोनवणे, तेजस वाघ, नीरज भारद्वाज व इतर ५-६ जण तिथे आले. विजय उर्फ चंग्या याने ‘क्या तू मेरे को मारने की बात करता है क्या’ असे म्हणून उद्देश याला सर्वांनी लाथा-बुक्यांनी मारहाण करत कोयत्याने डोक्यावर, गालावर व पाठीवर चॉपरने वार करून जखमी केले. तसेच साहील म्हस्के याच्या हातावरदेखील चॉपरने वार करून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाचण्याच्या वादावरून युवकावर कोयत्याने वारनाशिकरोड : जेलरोड ढिकलेनगर येथे हळदी समारंभात नाचताना धक्का लागला असता त्याचा जाब विचारल्याचा राग येऊन युवकावर कोयत्याने वार करून जखमी केले.जेलरोड पूर्वांचल कॉलनीत साईज्योत बंगला येथे राहणारे ऋषिकेश रवींद्र चौधरी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका हळदी समारंभात नाचत असताना यावेळी सागर दुसाने याचा धक्का लागल्याने त्याला व्यवस्थित नाचण्याचे सांगितले असता त्यास राग आल्याने त्याने व त्याचा मित्र रवि लिपणे याने लाकडी दांडुक्याने मारहाण केली, तर सागरने लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सागर दुसाने, रवी लिपणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी