नाशिक : परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना पंचवटीत शुक्रवारी (दि़ ८) घडली़ साक्षी एकनाथ बेंडकुळे (१६) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे़साक्षी ५६ टक्के गुण मिळवून उत्तीर्णही झाली. प्रतिकूल परिस्थितीत तिने चांगले गुण मिळविले असल्याने वडील एकनाथ बेंडकुळे यांनी समाधानही व्यक्त केले होते़ मात्र, ८० टक्के गुण मिळतील, अशी अपेक्षा असलेल्या साक्षीला ५६ टक्के गुण मिळाल्याने ती नाराज होती़ यातून दुपारी तिने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, मुलीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित करताच कुटुंबीयांनी रुग्णालय आवारातच हंबरडा फोडला़
नाशकात दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:31 IST