शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: आमदार कांदेच्या आरोपांच्या सरबत्तीने अधिकाऱ्याला आली भोवळ, पालकमंत्र्यांनी बैठक गुंडाळली

By संजय दुनबळे | Updated: July 15, 2023 13:44 IST

Suhas Kande: जिल्हा परिषदेकडून नियतव्ययाचे असमान वाटप करण्यात आल्याने नांदगाव विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या मालेगाव तालुक्यातील ४२ गावांना निधीच मिळत नसून याला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हेच जबाबदार असल्याचा आरोप नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी केल्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीचा नूरच पालटला.

- संजय दुनबळेनाशिक : जिल्हा परिषदेकडून नियतव्ययाचे असमान वाटप करण्यात आल्याने नांदगाव विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या मालेगाव तालुक्यातील ४२ गावांना निधीच मिळत नसून याला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हेच जबाबदार असल्याचा आरोप नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी केल्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीचा नूरच पालटला. या आरोपामुळे अर्जुन गुंडे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले. या गोंधळातच पालकमंत्र्यांनी सभा आटोपती घेतली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (दि.१४) जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत जिल्ह्यातील बहुसंख्य आमदार उपस्थित होते. सुरुवातीपासून शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या बैठकीत वेगवेगळ्या विषयांचा आढावा सुरू असतानाच नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी निधी नियतव्ययाचा प्रश्न उपस्थित केला. मालेगाव तालुक्यातील ४२ गावांना निधी मिळत नसून यासंदर्भात असलेला अध्यादेशच त्यांनी बैठकीत वाचून दाखविला. याला सर्वस्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हेच कारणीभूत असून ते कार्यालयात भेटत नाहीत. त्यांची पूर्णपणे माहिती देत नाहीत, असे वेगवेगळे आरोप त्यांनी केले. याबाबत गुंडे हे उत्तर देण्यास उभे होते. नियमाप्रमाणे निधीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात होते. मात्र ते बेालत असताना आमदार कांदे हे खंडन करण्याचा प्रयत्नही दुसऱ्या बाजूने करत होते. कांदेच्या आराेपांची सरबत्ती सुरू असतानाच गुंडे यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते पटकन खुर्चीवर बसले त्यांची तब्बेत बिघडल्याचे आजूबाजूच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांचा त्यांच्याभोवती गराडा पडला. डॉक्टरांची शोधाशोध सुरू झाली. यामुळे बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत योग्य ती चौकशी करून निर्णय घेण्याचे जाहीर करत पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक आटोपती घेतली.

टॅग्स :Nashikनाशिक