लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कादवा सहकारी साखर कारखाना आपल्या ४४व्या गळीत हंगामाची येत्या काही दिवसांतच सुरुवात करीत आहे.तालुक्यातील शेतकरीवर्गाने ऊस लागवडीला पसंती दिल्याने यंदाही कारखाना आपल्या गळीत हंगामाची यशस्वी सुरु वात करणार आहे. यंदा केंद्र शासनाने कादवा सहकारी साखर कारखान्याला २५०० टन गाळप क्षमतेस मंजुरी दिली असून, यावर्षी तेवढा ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०१९-२० च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाची संपूर्ण एफआरपी अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली आहे.गळीत हंगाम २०१९-२० मध्येही कादवाचा साखर उतारा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक असून, यंदाही कादवाची एफआरपी सर्वाधिक राहील, अशी आशा शेटे यांनी व्यक्त केली आहे. मागील हंगामात कारखान्याची एफआरपी साधारणपणे २७३६.३७ एवढी होती यंदा ही सरासरी आम्ही यशस्वी पूर्ण करू, असे त्यांनी सांगिलते. कारण तालुक्यातील शेतकरीवर्गाने ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. तालुका कृषी विभागाच्या माहितीच्या आधारे तालुक्यात जवळ जवळ २७०० हेक्टरच्या आसपास उसाची लागवड झाल्याचे समजते.हंगामाची सुरु वात करण्याची अंतिम तयारी पूर्ण झाली असून, ऊसतोड मजुरांची यंदा कमतरता येणार नाही याकडे यंदा कारखान्याने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे.प्रतिक्रि या...१) यंदा दिंडोरी तालुक्यात उसाला सुगीचे दिवस आहे. यावर्षी ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात निर्माण झाला होता; परंतु वेळीच नियोजन केल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले आहे. उसाला वजन कसे मिळेल याकडे शेतकरीवर्गाचे लक्ष आहे. वजनावर सरासरी अवलंबून असते. त्यासाठी शेतकरीवर्गाने मोठी मेहनत घेतली आहे.- रमेश देशमुख, ऊस उत्पादक, लखमापूर२) यंदा दिंडोरी तालुक्यातील ऊस लागवड २७०० हेक्टरच्या आसपास झाल्याने यंदा उसाची कमतरता येणार नाही. तसेच ऊस पिकाला जर काही समस्या निर्माण झाली तर त्वरित संपर्क साधावा.- एम.सिरसाट, कृषी अधिकारी, कादवा सहकारी साखर कारखाना. (२९ लखमापूर)
दिंडोरी तालुक्यात २७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 01:02 IST
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कादवा सहकारी साखर कारखाना आपल्या ४४व्या गळीत हंगामाची येत्या काही दिवसांतच सुरुवात करीत आहे.
दिंडोरी तालुक्यात २७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड
ठळक मुद्देदिलासा : कादवा कारखान्याच्या ४४व्या गळीत हंगामास होणार सुरु वात