शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी बाहेर पडणे टाळणेच योग्य: डॉ. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:34 IST

नाशिक - शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.२७) तर ४२.७ अशी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात नव्हे इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नाशिक शहरात उष्माघाताचे कक्ष उघडण्याचे आदेश दिले असले तरी नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देउष्माघात टाळणे आवश्यकडोक्याबरोबरच कानही झाकणे गरजेचे

नाशिक - शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.२७) तर ४२.७ अशी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात नव्हे इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नाशिक शहरात उष्माघाताचे कक्ष उघडण्याचे आदेश दिले असले तरी नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: उष्माघात टाळण्यासाठी उन्हात बाहेर पडण्याचे टाळावे आणि गरज भासलीत डोक्याबरोबरच कान देखील बंद ठेवावे कारण त्यातील उष्णता थेट मेंदुपर्यंत जात असते. त्यामुळे यासंदर्भात काळजी घ्यावी असे आवाहन नाशिक महापालिकेचे माजी वैद्यकिय अधिक्षक डॉ. डी. बी. पाटील यांनी केले आहे.प्रश्न : सध्या मोठ्या प्रमाणात उन जाणवत असून इतक्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढ किंवा उष्णतेची लाट जाणवत आहे. त्याचे काय परिणाम होऊ शकतात.?डॉ. पाटील : नाशिकमध्ये यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शासनाने उष्माघाताची शक्यता असल्याने विशेष कक्ष सुरू केले आहे. उन्हामुळे उष्माघात तर होऊ शकतोत. परंतु अन्य आजारही होऊ शकतात. उलट्याही होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहेप्रश्न: नागरीकांनी काय काळजी घेतली पाहिजे.?डॉ पाटील: मुळात बाहेर पडणे टाळले पाहिजे आणि बाहेर पडलेच तर सर्वच प्रकारची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच डोक्याबरोबर कान देखील बंद होतील अशी व्यवस्था करूनच बाहेर पडले पाहिजे. पुर्वीचे लोक पागोटे घालायचे त्यातून डोक्याबरोबरच कानाचे देखील संरक्षण होत असे. त्यामुळे ही प्रथम काळजी घ्यावी दुसरीबाब म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे म्हणजे डीहायड्रेशन होणार नाही.प्रश्न: उन्हाळ्यात खूप लोक शीत पेय पितात, त्याबाबत काय सांगाल?डॉ. पाटील: उन्हाळ्यात पाणी खूप प्यायले पाहिजे आणि लिंबु सरबत देखील घेतले पाहिजे. अलिकडे लोक ताक, लस्सी असे पदार्थ घेतात. परंतु त्यासाठी पाणी कुठून आणले ते शुध्द की दुषीत माहिती नसते. त्यामुळे या काळात जलजन्य आजारही बळवतात. त्या पार्श्वभूमीवर असे पदार्थ टाळले पाहिजे आणि विशेष करून बाहेर खाणे- पिणे टाळले पाहिजे.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यSun strokeउष्माघात