शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:58 IST

शिवसेना ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली आहे. दरम्यान, आता ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात हालचालींना वेग आला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे सुधाकर बुडगुजर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. काही दिवसापूर्वी बुडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, यानंतर ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी केली. तर दुसरीकडे भाजपामध्ये प्रवेशाला अंतर्गत विरोध सुरू होता. दरम्यान, आता  बुडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे समोर आले. 

सुधाकर बडगुजरांची कोंडी! CM फडणवीसांसमोर भाजप आमदार, माजी नगरसेवकांनी मांडली गुन्ह्यांची कुंडली

आता स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला असून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त लागणार आहे. स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण, पक्ष वाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होतो. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिले.

सुनिल केदार म्हणाले, आपण जरी त्यांना पक्षात घेतले नाही तरी ते इतर पक्षात जाणारच आहेत. त्यामुळे त्यांना आपण प्रवेश दिला पाहिजे, असे त्यांनी आम्हाला सूचित केलेले आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. स्थानिकांचा विरोध साहजिकच आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले आहेत. एकमेकांविरुद्ध आरोप केलेले आहेत. त्यामुळे स्थानिक नाराज असतात. पण, वरिष्ठांनी आम्हाला शब्द दिला आहे की, स्थानिकांच्या कुठल्याही हक्कावर अडसर येणार नाही.

आधी केला विरोध

बुडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपामधूव आधी नेत्यांनी विरोध केला. विविध घोटाळे व वेगवेगळ्या प्रकारच्या २९ गुन्ह्यांची कुंडली सादर करीत सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेऊ नये, या मागणीसाठी आमदार सीमा हिरे यांच्यासह १४ माजी नगरसेवक आणि डझनभर पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला. असा प्रकार असेल तर प्रवेशासंदर्भात नक्कीच विचार करू, असे आश्वासन बावनकुळे यांनी शिष्टमंडळास दिले होते.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना