शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

...असा झाला विकास आराखड्याचा प्रवास!

By admin | Updated: January 10, 2017 01:28 IST

...असा झाला विकास आराखड्याचा प्रवास!

नाशिक : सन २०१३ मध्ये सुरू झालेला शहर विकास आराखड्याचा प्रवास अखेर जानेवारी २०१७ मध्ये येऊन थांबला असला तरी भागश: प्रसिद्ध झालेल्या आराखड्याचा खरा प्रवास मे २०१७ मध्ये संपुष्टात येणार आहे. चार वर्षांत वादग्रस्त ठरलेल्या विकास आराखड्यातील एकूण ४८२ पैकी ७७ आरक्षणांमध्ये शासनाने सुधारणा केल्या आहेत तर काही आरक्षणांत बदल सुचविले आहेत. महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट आली आणि महापालिका क्षेत्रासाठी पहिला विकास आराखडा १९९६ मध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर २० वर्षांनी नवीन विकास आराखडा तयार करणे अपेक्षित होते. त्यानुसार, महापालिकेने सन २०१३ मध्ये पुढील वीस वर्षांचा विचार करत शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. तत्कालीन नगररचना सहायक संचालक सुलेखा वैजापूरकर यांनी आराखडा तयार केल्यानंतर तो जाहीर होण्यापूर्वीच फुटला आणि आराखडा वादात अडकला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकण्यात आल्याने शेतकरी वर्ग संघटित होऊन रस्त्यावर उतरला. या आराखड्याने धनदांडग्यांच्या जमिनींना संरक्षण दिल्याचा आरोप झाला. त्यामुळे महापालिकेच्या महासभेने सदर आराखडा फेटाळून लावला. त्यानंतर तत्कालीन कॉँग्रेस आघाडी सरकारने विकास आराखडा रद्दबातल ठरवत नवीन विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आणि त्यासाठी नगररचना सहायक संचालक प्रकाश भुक्ते यांची नियुक्ती केली. भुक्ते यांनी मुदतीत त्यावर काम करत २३ मे २०१५ रोजी विकास आराखड्याचे प्रारूप जाहीर करत त्यासाठी हरकती व सूचना मागविल्या. या प्रारूप आराखड्यात भुक्ते यांनी ४८२ आरक्षणे प्रस्तावित केली होती. त्यासाठी ५ हजार १७४ कोटी रुपये भूसंपादनासाठी लागणार होते. केवळ रस्त्यांच्या विकासासाठी ५५२ कोटी रुपये लागण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. भुक्ते यांनी आराखड्यात झोपडपट्टी पुनर्विकासासाठी तीन एफएसआय, शहरात ७० मीटर उंच इमारती, फ्यूचर अर्बनायझेशन झोन आदि काही तरतुदी प्रस्तावित केल्या होत्या. हरकती व सूचना मागविल्यानंतर समितीने त्यावर सुनावणी घेऊन सदर आराखडा शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला. परंतु सन २०१६ हे संपूर्ण वर्ष सरले तरी विकास आराखडा मंजुरीला मुहूर्त लाभत नव्हता. राष्ट्रवादीचे आमदार जयवंत जाधव यांनी विकास आराखड्याला विलंब लागत असल्याने थेट विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी लवकरच आराखडा जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन देऊनही आराखडा जाहीर न झाल्याने जाधव यांनी हक्कभंगाची नोटीस दिली होती. दरम्यान, सदर विकास आराखडा लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनीही वारंवार पाठपुरावा केला. मागील महिन्यात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा दिवसांत आराखडा जाहीर होणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही आराखडा जाहीर न झाल्याने धडधड वाढली. अखेर मागील सप्ताहात मुख्यमंत्र्यांनी आराखड्यावर स्वाक्षरी केली आणि आचारसंहितेत अडकण्यापूर्वीच अधिसूचना निघाल्याने शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)