शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चौरंगी लढतीचे यशापयश मतविभागणीच्या हाती

By admin | Updated: October 11, 2014 23:25 IST

चौरंगी लढतीचे यशापयश मतविभागणीच्या हाती

व्यक्तिकेंद्रित राजकारणाची ओळख निर्माण केलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघात यंदा चार तुल्यबळ पक्षांमध्ये खरी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र या चौरंगी लढतीच्या यशापयशाची खरी मदार मतविभागणीवर अवलंबून आहे. नाते-गोते आणि गट-तट तसेच वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहूनसुद्धा आतून भलत्याच उमेदवाराला रसद पुरविण्याचे तंत्र वापरणे सुरू झाल्याने कोण नेमकी कोणाची मते खेचतो याभोवतीच निकालाचे गणित फिरणार आहे.शिवसेनेकडून आमदार अनिल कदम, राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार दिलीप बनकर, काँगे्रसकडून राजेंद्र मोगल, भाजपाकडून वैकुंठ पाटील, मनसेकडून सुभाष होळकर, बसपाकडून धर्मेंद्र जाधव, तर अपक्ष म्हणून नईम शब्बीर शेख नशीब आजमावित आहेत. प्रारंभी आजी-माजी आमदारांमध्येच दुरंगी लढत होईल, असे गृहितक मानले जात होते. मात्र युती आणि आघाडीमधला ‘संसार’ दुभंगला आणि प्रचाराचा ज्वर जसाजसा चढू लागला तसे स्वतंत्र लढतीचे चित्र बदलत गेले. आजच्या घडीला प्रमुख पक्षांमध्ये चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. आतापर्यंत ओझर-सुकेणा-पिंपळगाव पट्ट्याचे एक गठ्ठा मतदान निर्णायक ठरायचे. यंदा मात्र चौरंगी लढतीतील उमेदवार आपापल्या भागातील मते मिळविण्यासोबतच नाते संबंधातील मते खेचणार असल्याने चारही दिशेकडील मते पदरात पाडून घेण्यात कोण यशस्वी होतो, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. विद्यमान आमदार कदम यांनी सेनेचा भक्कम उभारलेला गड, जनसंपर्काच्या बळावर तालुक्यात कार्यकर्त्यांचे विणलेले जाळे या गोष्टी त्यांच्यासाठी पोषक मानल्या जात असल्या तरी गोदाकाठच्या भागातील रस्त्याच्या न सुटलेल्या समस्या तसेच तालुक्यात येवला-सिन्नरच्या धर्तीवर टोलेजंग इमारतींसारखी भरीव कामे न केल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहेच.राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून विरोधक म्हणून बजावलेली भूमिका, पक्षाचे वाढविलेले संघटन, भुजबळांची लाभलेली साथ, तसेच गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीत राहून घरभेदी करणाऱ्या नेत्यांना आपलेसे करण्यात मिळविलेले यश या बनकरांच्या दृष्टीने जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. कॉँग्रेसचे राजेंद्र मोगल यांच्यामागे स्व. माजी आमदार मालोजीराव मोगल यांची पुण्याई, सहानुभूती, निसाकाची थबकलेली चाके नव्याने फिरविण्यासाठी वठविलेली महत्त्वाची भूमिका तसेच विविध पक्षांमध्ये विखुरलेला पूर्वाश्रमीचा मोगल गट या निवडणुकीत मात्र मागे उभा राहिल्याने राजेंद्र मोगल यांच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. भाजपाचे वैकुंठ पाटील यांना मोदी प्रभावाचा किती लाभ होतो याचा निष्कर्ष आत्ताच काढणे शक्य नसले तरी निफाडच्या पूर्व आणि मध्य भागावर असलेली त्यांची पकड, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेशबाबा पाटील व कॉँग्रेसचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचा पुतण्या, तसेच तालुक्यात मोगल यांच्या पाठोपाठ असलेले मोठे नातेसंबंध याचा लाभ पाटील यांना नक्कीच होणार आहे. मनसेचे सुभाष होळकर नात्याने दिलीप बनकर यांचे चुलत जावई असल्याने, तसेच व्यापारामुळे पिंपळगाव बसवंतमध्ये वाढलेल्या संपर्काच्या बळावर निर्णायक मते मिळविण्यापर्यंत ते मजल गाठतील, असे वाटते. बनकर यांच्या वोट बॅँकेत वाटेकरी होणार असल्याने होळकर व मोगल यांची उमेदवारी बनकर यांच्यासाठी, तर वैकुंठ पाटील यांची उमेदवारी कदम यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकेल.निफाड मतदारसंघात यावेळी चारही उमेदवारांमध्ये होणारी मतविभागणी निवडणूक रंगतदार आणि अटीतटीची होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.