सिन्नर : येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदो स्पर्धेत यश मिळवले. या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित सदर स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे संकुलात पार पडल्या. रोशनी शिवाजी जाधव हिने ४६ किलो वजनीगटात धुळे व जळगाव येथील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. आशुतोष सुरेश भारती याने ७० किलो वजनीगटात मालेगाव व जळगाव येथील प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक मिळवले. या खेळाडूंची अलिबाग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आश्विनी रंधे, वैभव जाधव, पूजा माळी या खेळाडूंनीही दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. यशस्वी खेळाडूंना सोपान जाधव, अविनाश कदम, के. जी. मंडले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मविप्रचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सरचिटणीस नीलिमाताई पवार, चिटणीस नितीन ठाकरे, उपसभापती नानाजी दळवी, संचालक कृष्णाजी भगत, डॉ. एस. एस. काळे, ए. पी. देशमुख, दिनेश कानडे यांनी कौतुक केले आहे. (वार्ताहर)
तायक्वांदो स्पर्धेत यश
By admin | Updated: September 22, 2016 00:47 IST