लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ध्येय निश्चिती आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर या स्पर्धा परीक्षेत यश मिळणे अवघड नाही, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यजुवेंद्र महाजन यांनी केले. नाशिक जिल्हा माहेश्वरी सभेतर्फेआयोजित प्रशासनिक सेवा मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई येथील सहायक विक्र ीकर आयुक्त माहुल इंदाणी, सर्वेश कासट (आयआरएस ), प्रा. किसनप्रसाद दरक, वृंदा राठी, दर्शित जाजू, अविश मारू, जयप्रकाश लाहोटी, महेश कलंत्री, अनिल करवा, केदार मंत्री आदि उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना महाजन म्हणाले की, स्पर्धा परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेला न्यूनगंड सर्वप्रथम दूर झाला पाहिजे. मुलाखतीदरम्यान प्रामाणिकपणे उत्तरे देणे अपेक्षित असते. समाजासाठी काहीतरी करण्याची भावना मनात ठेवून तुम्ही काम करा. या क्षेत्रात भाषा हा अडसर ठरू शकत नाही. तुम्हाला जिथे कुठे पोस्टिंग मिळेल त्या प्रांताची भाषा शिकण्यासाठी शासनाची संस्था कार्यरत असून, बदलीच्या ठिकाणी जाण्याआधी तुम्ही तेथील भाषा या संस्थेत जाऊन शिकू शकतात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माहुल इंदाणी, सर्वेश कासट, प्रा. किसनप्रसाद दरक यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयआयटी जेईई या परीक्षेत भारतात मुलींमध्ये सर्वप्रथम आलेली वृंदा राठी व आयआयटी रु रकी मधून बी. टेक. व आय.आय.एम. अहमदाबाद येथून एमबीए केलेले दर्शित जाजू यांचा सत्कार करण्यात आला. माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश मुंदडा, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रभा मुंदडा व विनोद जाजू यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अविश मारू यांनी केले. आभार संतोष जाजू यांनी मानले. यावेळी माहेश्वरी महासभेचे अशोक बंग, जयप्रकाश जातेगावकर, रामविलास बूब, रमेश झंवर, आदि मान्यवरांसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभ्यासातील सातत्याने परीक्षेत यश
By admin | Updated: May 23, 2017 01:29 IST