शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यातून चिमुरडीला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 13:24 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले. नांदूरवैद्य येथील कर्पे मळा, सायखेडे मळा, शिवाचा ओहोळ आदी ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे काही महिन्यांपुर्वी या ठिकाणी असलेल्या सायखेडे मळा परिसरात सुकदेव सायखेडे यांच्या गायीवर या बिबट्याने हल्ला चढवत गायीला ठार केले होते. सदर बिबट्या आपले भक्ष शोधण्यासाठी चक्क गावात येत असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच नांदूरवैद्य ते वंजारवाडी दरम्यान ऊसशेती जास्त असल्याने तसेच तीन ते चार पोल्ट्री फार्म असल्यामुळे बिबट्याचा भक्ष शोधण्यासाठी या परिसरात गेल्या अनेक अनेक दिवसांपासून वावर असल्याचे येथील शेतकर्यांनी सांगितले. यानंतर सदर घटनेची माहिती कर्पे यांनी दुरध्वनीवरून वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डोमसे व वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी शैलेश झुटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शालीनी पवार, श्रीमती साबळे यांनी पंचनामा केला.या घटनेत सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाल्याचे कर्पे यांनी सांगितलेÞ.घटनास्थळी बाळू कर्पे, दत्तु काजळे, मुकुंदा यंदे, सुरेश मुसळे आदीसह वनविभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.---------------वासराचा फडशा, गायी दोरखंड तोडून पळाल्याराञीच्या दोन वाजेच्या सुमारास भक्ष शोधण्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याने एक वासरू ठार झाले तर याचवेळी सोबत बांधलेल्या इतर गायींनी दोरखंड तोडून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यश आले.यानंतर सकाळी येथील कर्पे हे आपल्या गोठ्यात गायींना चारा देण्यासाठी जात असतांना सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले.या घटनेमुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.तर शेतकर्यांनी आपली जनावरे उघड्यावरच बांधत असल्यामुळे या परिसरात बिबट्या हल्ला करत आहे तर शेतकर्यांनी आपल्या जनावरांना निवा-याची सोय करावी त्यामुळे बिबट्या हल्ला करणार नाही असे यावेळी वनविभागाने शेतकर्यांना माहिती देतांना सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक