शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचा गुटखा पकडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:10 IST

गुजरातमधून नाशिकच्या सिडको परिसरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका वाहनचालकासह चारचाकी वाहन आणि लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आहे आहे. पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकात कारवाई करून हा मुद्देमाल हस्तगत केला.

ठळक मुद्देएक ताब्यात : गुजरात राज्यातून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती

पंचवटी : गुजरातमधून नाशिकच्या सिडको परिसरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका वाहनचालकासह चारचाकी वाहन आणि लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आहे आहे. पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकात कारवाई करून हा मुद्देमाल हस्तगत केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुजरातमधून गुटखा घेऊन आडगावकडून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या महिंद्रा मार्शल (एमएच १५ आर ३७७५) वाहनाचा चालक वाहतूक शाखेच्या पोलिसांना चकवा देत पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांनी संशयित वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यातून तीन ते चार लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांना आढळून आला. या कारवाईत पेठ येथील वाहनचालक शंकर येवला (३१) याला ताब्यात घेत चारचाकी वाहनासह गुटखा जप्त केला असून, संशयिताला आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. येवला पोलिसांना चकवा देत रासबिहारी चौकातून सिडकोकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे जप्त केलेला गुटखा गुजरातमधून आणून त्याची सिडकोत तस्करी होत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाहतूक शाखेचे झेब्रा पथक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी गणेश माळवाल, राजेंद्र जाधव, अनंत गारे, अमोल काळे या कर्मचाऱ्यांनी असे मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौक परिसरात गस्त घालत असतानाही कारवाई केली.दरम्यान, आडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी सदर घटनेबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती देत पंचनामा केला. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.अन्न औषध प्रशासनाविषयी साशंकतानाशिक शहरात दररोज लाखो रुपये किमतीचा गुटखा चोरी छुप्या पद्धतीने आणला जात असला तरी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला याची कोणत्याही प्रकारचा सुगावा लागत नाही. शिवाय संबंधित अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याने नाशिक शहरात बहुतांश दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होताना दिसून येते. महिनाभरापूर्वीच आडगाव शिवारातील बलीमंदिर चौकातअशाच प्रकार गुटखा पकडण्यात आला होता. मात्र याबाबत अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भूमिकेविषयी साशंका व्यक्त होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी