अमली पदार्थाचे सेवन; दाम्पत्याकडून शांतता भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:29 AM2017-10-17T00:29:09+5:302017-10-17T00:31:14+5:30

नाशिक : अमली पदार्थ सेवन करून रस्त्यात आरडाओरड करणाºया दाम्पत्यास समजावून सांगणाºया गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाची गच्ची पकडून दमदाटी केल्याची घटना रविवारी (दि़१५) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवर घडली़

 Substance use; Break the silence from the couple | अमली पदार्थाचे सेवन; दाम्पत्याकडून शांतता भंग

अमली पदार्थाचे सेवन; दाम्पत्याकडून शांतता भंग

googlenewsNext

नाशिक : अमली पदार्थ सेवन करून रस्त्यात आरडाओरड करणाºया दाम्पत्यास समजावून सांगणाºया गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाची गच्ची पकडून दमदाटी केल्याची घटना रविवारी (दि़१५) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवर घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास संशयित राहुल प्रेम गांधी व हर्षा
राहुल गांधी (रा. रामेश्वरनगर, पाइपलाइनरोड, नाशिक) हे अमली पदार्थाचे सेवन करून कॉलेजरोडवरील बंधन बँकेसमोरील भोसला टी पॉइंटजवळ मोठ्याने आरडाओरड करीत होते़ याठिकाणी सुरू असलेल्या गोंधळामुळे शांततेचा भंग झाला. त्यावेळी त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सजन बच्छाव हे समजावून सांगत असताना संशयित राहुल गांधी याने गच्ची पकडून आमचे नवरा-बायकोचे भांडण आहे़
तुमचा काही संबंध नाही असे म्हणून दमदाटी केली़ तर त्यांची पत्नी हर्षा गांधी यांनी महिला पोलीस कर्मचाºयाचे डोक्याचे केस धरून ओढत तुमच्याकडे पाहून घेतो, असा दम दिला़
गांधी दाम्पत्याविरोधात गंगापूर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title:  Substance use; Break the silence from the couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.