शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

कांदा अनुदानासाठी पुन्हा कागदाची जमवाजमाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:52 IST

खामखेडा : राज्य शासनाने कांदा अनुदानासाठी जानेवारी महिन्यात बाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याला अनुदान जाहीर केल्याने शेतकरी पुन्हा कागदाची जमवाजमाव करतांना दिसून येत आहे.

ठळक मुद्दे आता सातबारा उतारा काढण्यासाठी सकाळपासून तलाठी कार्यालयात गर्दी

खामखेडा : राज्य शासनाने कांदा अनुदानासाठी जानेवारी महिन्यात बाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याला अनुदान जाहीर केल्याने शेतकरी पुन्हा कागदाची जमवाजमाव करतांना दिसून येत आहे.राज्य शासनाने आता पर्यत एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत बाजार समितीत विक्र ी केलेल्या कांद्याला दोनशे रु पये प्रती क्विंटल अनुदान जाहीर केले होते. परंतु या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी निमित्त मार्केटला बऱ्याच दिवस सुट्या होत्या. तसेच दिवाळी झाल्यानंतर कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरणा झाल्याने पुढे काही दिवसाने कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेने शेतकºयांनीे कांद्याची विक्र ी केली नाही.परंतु दिवाळी नंतर बाजारात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने उन्हाळी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. परंतु जे काही मिळेल यासाठी शेतकरी ज्या बाजार समितीमघ्ये कांदा विक्री केला होता. परंतु चालू वर्षी लाल कांद्याचे मोठया प्रमाणात उत्पादन झाल्याने व उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्याने मार्केटमघ्ये आवक वाढली, पर्यायाने कांदा कवडीमोल भावाने विकला जात होता.विक्र ी केलेल्या कांद्याच्या पैशातून मजुरी आणि वाहन भाडे सुद्धा मिळत नव्हते. परंतु पुन्हा जर शासनाने विक्र ी केलेल्या कांद्याला अनुदान जाहीर केले तर निदान अनुदानाचे पैसे तर हाती मिळतील या आशेवर शेतकरी घरातून पैसे देऊन कांद्याची विक्री करीत होता. आता पर्यत दोन वेळेस शेतकºयाने कांदा विक्र ीची पावती, जमिनीचा सातबारा उतारा त्यावर कांदा पिक लागवड केल्याची नोंद, आधार कार्डची झेरॉक्स, बॅँक पासबुक झेरॉक्स हि सर्व कागद पत्रे जेथे कांदा विक्र ी केली आहे. त्या बाजार समितीत त्या बाजार समितीचा फॉर्म भरून जमा केले. परंतु यासाठी मोठी धावपळ करावी लागली आणि पुन्हा शासनाने कांद्याच्या अनुदानासाठी जानेवारी महिन्यात विक्र ी केलेल्या कांद्यासाठी मुदत वाढ दिली.परंतु पुन्हा राज्य शासनाने एक जानेवारी ते एकतीस जानेवारी महिन्यात विक्र ी केलेल्या कांद्याला अनुदान देण्याचे जाहीर केलेल्याने पुन्हा शेतकरी या कागदाची जमावाजमाव करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता सातबारा उतारा काढण्यासाठी सकाळपासून तलाठी कार्यालयात गर्दी वाढली आहे.