मालेगाव : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे शिरपूर आगाराच्या बसचालक व वाहकाला झालेल्या मारहाणप्रकरणी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मातोश्री टेम्पो ट्रक, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यातआले.निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर आगाराची बस (क्र. एमएच २० बीएल २६७२) ही औरंगाबादकडे जात असताना बसचालक एस. एम. शिरसाठ व वाहक जी. बी. पाटील यांना कन्नडनजीक अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. संबंधितांवर कारवाई होऊन कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सुनील चांगरे, कृष्णा बाविस्कर, दादाजी चव्हाण, अरुण आहेर, सुभाष ठोके यांच्या सह्या आहेत.
चालक-वाहक मारहाणप्रकरणी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:14 IST