शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विषय समित्यांच्याही निवडणुका एप्रिलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:31 IST

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीबरोबरच मागील वर्षी नव्याने गठित केलेल्या विषय समित्यांच्याही सभापतिपदाकरिता निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या ९ एप्रिलला विशेष महासभा घेतली जाणार असून, त्यात विधी, आरोग्य व वैद्यकीय सहाय्य, शहर सुधारणा आणि महिला व बालकल्याण समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्यानंतर, ९ ते १३ एप्रिल या कालावधीत प्रभाग सभापतिपदासह विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदाचाही निवडणूक कार्यक्रम लावला जाण्याची शक्यता आहे.

नाशिक : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीबरोबरच मागील वर्षी नव्याने गठित केलेल्या विषय समित्यांच्याही सभापतिपदाकरिता निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या ९ एप्रिलला विशेष महासभा घेतली जाणार असून, त्यात विधी, आरोग्य व वैद्यकीय सहाय्य, शहर सुधारणा आणि महिला व बालकल्याण समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्यानंतर, ९ ते १३ एप्रिल या कालावधीत प्रभाग सभापतिपदासह विषय समित्यांच्या सभापती उपसभापति पदाचाही निवडणूक कार्यक्रम लावला जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी महापालिकेत सर्वाधिक ६६ जागा जिंकत भाजपाने सत्ता संपादन केली. त्यानंतर, प्रशासनामार्फत सहाऐवजी नऊ प्रभाग समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, जास्तीत जास्त सदस्यांना सत्तापदांचा लाभ मिळावा याकरिता सत्ताधारी भाजपाने सहाच प्रभाग समित्या कायम ठेवत त्याऐवजी तीन विषय समित्या नव्याने गठित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, तीनही विषय समित्यांवर पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुका २४ जुलै २०१७ रोजी घेण्यात आल्या. त्यात, विधी समितीच्या सभापतिपदी भाजपाच्या शीतल माळोदे, आरोग्य समितीच्या सभापतिपदी सतीश कुलकर्णी, शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदी भगवान दोंदे यांची निवड करण्यात आली. याशिवाय, महिला व बालकल्याण समितीच्याही सभापतिपदी सरोज अहिरे यांची वर्णी लावण्यात आली. आता, प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याची तयारी नगरसचिव विभागाकडून सुरू झाली असतानाच सत्ताधारी भाजपाने प्रभागबरोबरच विषय समित्यांच्याही सभापती-उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महासभेचा एकत्रित निवडणुका घेण्याचा ठरावही नगरसचिव विभागाकडे पाठविण्यात आला आहे.विद्यमानांच्या कालावधीत कपातसत्ताधारी भाजपाने ९ प्रभाग समित्या करण्याऐवजी विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या तीन विषय समित्या गठित केल्या. त्यावर सभापती-उपसभापती नेमण्यात येऊन नवख्यांना संधी देण्यात आली. सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुका २४ जुलै २०१७ रोजी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची मुदत जुलैमध्ये संपत असताना सत्ताधारी भाजपाकडून मात्र मुदतीपूर्वीच समित्या बरखास्त करत नव्याने सभापती-उपसभापती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यमान सभापती-उपसभापतींना अवघा आठ महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. त्यातून नाराजीचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका