मालेगाव : सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता बाजार जागा शुल्क वसुली संकलन करण्यासाठी जय भीम मजूर व बांधकाम सोसायटीच्या निविदेसह कब्रस्तान संरक्षक भिंत बांधकाम निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेझ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. या बैठकीत मक्तेदारांच्या बयाणा रकमा परत करण्यासह १३ विषयांना स्थायी समितीने मंजुरी दिली. तसेच महापालिका क्षेत्रातील व हद्दवाढ भागातील व्यापारी गाळ्यांचे करारनाम्यांची मुदत संपली असून, अशा मिळकतींचा ताबा घेऊन भाडे कराराने देण्याचा विषय नस्तीबंद करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य मदन गायकवाड, अस्लम अन्सारी आदींसह सदस्य उपस्थित होते.
मालेगाव मनपाच्या स्थायी समितीत विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:20 IST