त्र्यंबकेश्वर : पर्वणी दरम्यान त्र्यंबकच्या उपजिल्हा रुग्णालयाचा रुग्णांना चांगला लाभ झाला आहे.वर्षभरापूर्वीच त्र्यंबकच्या रुरल हॉस्पिटलचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात उपजिल्हा रुग्णालयाची गरज प्रकर्षाने जाणवणार असल्याने यापूर्वीच कागदपत्रे, पेपरची कात्रणे, जमा करण्यात येऊन प्रत्यक्षात वर्षभरात उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात आले. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्यात गत पर्वणीला भाविकांची रुग्णालयाबाबतची गैरसोय दूर झाली. वेळेवर सेवा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचे प्राण वाचू शकले. रुग्णालयात अस्थिरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ब्लड बँकेची सुविधा आहे. एकावेळी प्रत्येक रक्तगटाच्या २/२ बॅग्ज, एकाच वेळेस २२ बॅग्ज तयार असणार आहे. याशिवाय भूलतज्ज्ञ रुग्णालयात आहे. कोणत्याही दुर्घटनेस हॉस्पिटल सज्ज आहे. दोन्हीही पर्वणीकाळात वाहनतळ, त्र्यंबकेश्वर मंदिर, निवृत्तिनाथ मंदिर याशिवाय प्रत्येक आखाड्यात १०८ क्रमांकाची वाहने उभी केलेली असतात. मोबाइल रुग्णवाहिकेचा हजारो साधू-महंतांनी लाभ घेतला आहे. एकूणच त्र्यंबकेश्वरची वैद्यकीय सेवा अद्ययावत करण्यामागे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. पाटील, स्थानिक आणि कधीही सज्ज असलेले डॉ. भागवत लोंढे, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. अशोक माने, बालरोगतज्ज्ञ डॉ. विठ्ठल काळे आदिंचे सहकार्य मिळत आहे.(वार्ताहर)
उपजिल्हा रुग्णालयात गर्दी
By admin | Updated: September 14, 2015 22:40 IST