शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून उपनिरीक्षकाची आत्महत्त्या

By admin | Updated: May 1, 2016 00:18 IST

रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून उपनिरीक्षकाची आत्महत्त्या

नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकादमीत (एमपीए) कर्तव्यावर असलेल्या राज्य राखीव दलातील पोलीस उपनिरीक्षकाने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी (दि़ ३०) घडली़ या उपनिरीक्षकाचे नाव उत्तम मारुती धनवटे (५७, रा़धुळे, मूळ रा़ मनमाड, ता़जि़नाशिक) असे आहे़ दरम्यान, कौटुंबिक कारणावरून ही आत्महत्त्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संरक्षणाची जबाबदारी एसआरपीएफकडे असून, राज्याच्या विविध ठिकाणचे एसआरपीएफचे अधिकारी व कर्मचारी ३५ दिवसांच्या बंदोबस्तासाठी तैनात केले जातात़ १६ एप्रिल रोजी धुळे येथील एसआरपीएफच्या दोन प्लाटून नाशिक एमपीएमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या़ त्यामध्ये धुळे एसआरपीएफच्या ग्रुप नंबर ६ मधील कंपनी ‘ए’ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर उत्तम धनवटे यांचाही समावेश होता़ (पान ५ वर)महाराष्ट्र पोलीस अकादमीतील क्युआरटी बॅरेकच्या रुममध्ये शनिवारी (दि़३०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धनवटे यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्त्या केली़ बॅरेकमधील गोळीचा आवाज ऐकून कर्मचारी तेथे गेले असता हा प्रकार समोर आला़ या घटनेची माहिती हवालदार रोहित पवार यांनी गंगापूर पोलिसांना कळविली़ गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर काळे यांनी एमपीएमधील घटनास्थळी भेट देऊन आत्महत्त्येसाठी वापरण्यात आलेले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, खाली केस व मॅक्झिन ताब्यात घेतले तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविला़ दरम्यान, धनवटे यांनी कौटुंबिक कारणातून आत्महत्त्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, या घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)