शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पत्रपेटी ते एटीएमपर्यंतचा प्रवास जाणून घेताना ‘वाणिज्य’चे विद्यार्थी थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:31 IST

विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देटपाल बटवडा विभाग, स्पीड पोस्ट विभाग, फ्रॅन्कींग विभागाला भेटी बीवायके महाविद्यालयाकडून हा अभ्यास दौरा

नाशिक : वाणिज्य शाखेतून पदवी घेणाऱ्या बीवायके महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या चमूने नुकतीच शहरातील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत ‘पोस्ट बॅँकिंग’सह विविध योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.वाणिज्य शाखा म्हटली की बॅँकिंग क्षेत्र आलेच. दिवसेंदिवस बॅँकिंगमध्ये घडून येणारे अमुलाग्र बदल आणि त्याच दृष्टीकोनातून टपाल खात्यानेदेखील टाकलेली कात लक्षात घेता बीवायकेच्या सुमारे दहा ते बारा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परवानगीने टपाल कार्यालयाला भेट दिली. यावेळी वरिष्ठ पोस्त मास्तर मोहन अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना टपाल विभागाच्या बॅँकिंगप्रणालीसह आर्थिक व्यवहाराबाबतच्या टपालाच्या विविध योजनांची माहिती दिली. सुकन्या समृध्दी योजना, इंडियन पोस्ट पेमेंट बॅँक, भविष्यनिवार्हनिधी खाते योजना, बचत किसान पत्र, पोस्टल विमा, मुदत ठेव या आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित चालणा-या कार्याचाी सविस्तर माहिती दिली. तसेच आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खात्याचा कामाचा ताण निम्म्यापेक्षा अधिक कमी झाल्याचा गैरसमजही दूर करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.टपाल बटवडा विभाग, स्पीड पोस्ट विभाग, फ्रॅन्कींग विभागाला भेटी देत विद्यार्थ्यांनी येथील प्रत्यक्ष कार्यानुभव याचि देही याचि डोळा बघितले. तसेच पोस्ट खाते काळानुरूप आधुनिक झाले असल्याचा प्रत्ययदेखील विद्यार्थ्यांना आला. येथील पत्रपेटी, टपाल डिलिव्हरी व्हॅन आणि एटीएम बघून विद्यार्थी अवाक् झाले. पत्रपेटीपासून सुरू झालेला टपाल खात्याचा प्रवास थेट एटीएमपर्यंत येऊन पोहचल्याचे बघून विद्यार्थ्यांनाही आनंद झाला. सर्वात सुरक्षित असे सरकारी नियंत्रण असलेले जुने खाते म्हणून पोस्टाची ओळख विद्यार्थ्यांना पटली. अहिरराव यांनी पोस्टाचे विविध अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपसंदर्भातही विद्यार्थ्यांना माहिती दिली. बीवायके महाविद्यालयाकडून हा अभ्यास दौरा पदवीच्या अखेरच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांकरिता प्रत्यक्ष अभ्यास अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसNashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र