शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचा दंगामस्तीचा तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:51 IST

कृष्णावाडी शाळेची अवस्था : शिक्षकांच्या बदल्यामुळे ओढवली स्थिती

ठळक मुद्दे शाळेत मुलांची पटसंख्या ६० इतकी आहे . याठिकाणी लवकरात लवकर शिक्षक नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

येवला : तालुक्यातील दुगलगावच्या कृष्णावाडी येथे जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेवर शाळा उघडल्यापासून शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पालक वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षकांची बदली केल्यामुळे याठिकाणी अशी परिस्थिती ओढवली आहे.शाळा सुरू होऊन चार दिवस उलटले तरीही दुगलगावच्या कृष्णवाडी शाळेवर एकही शिक्षक नाही. या शाळेला दुगलगावचे सरपंच विश्वनाथ सूर्यभान मोरे, उपसरपंच अशोक अंबादास लासुरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सखाहरी पुंडलिक मोरे, मनसेचे जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, पालक शंकर मनोहर वाघ आदींनी भेट दिली असता शाळेत शिक्षक नसल्याने मुले शाळेच्या बाहेर दंगा मस्ती करताना आढळून आले. या वस्तीशाळेवर एक ते सहा वर्ग आहेत. या ठिकाणी पूर्वी तीन शिक्षकांची नेमणूक होती. त्यानंतर दोन शिक्षक कार्यरत राहिले. त्यांचीही बदली झाल्याने या शाळेला आता कोणीही वाली उरला नाही. त्यामुळे मोबाईल शिक्षक प्रवीण मंडाळकर यांना पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी मुलांना शिकविण्यासाठी पाठविले. शाळेत मुलांची पटसंख्या ६० इतकी आहे . याठिकाणी लवकरात लवकर शिक्षक नियुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा शाळेला कुलूप ठोकून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा